

Menopause Myths & Facts
esakal
Womens Health: प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. वयाची तिशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांना मासिक पाळीत अनियमितता येणे, मूड स्विंग्स होणे, अचानक अंगातून उष्णता निघाल्यासारखे वाटणे (Hot Flashes) आणि सतत थकवा जाणवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी 'आपल्याला इतक्या कमी वयातच मेनोपॉज (रजोनिवृत्ती) आला की काय?' अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते.