World No Tobacco Day: तंबाखूचं व्यसन का होतं, कसं मोडायचं आणि आरोग्य वाचवायचं?
Health Awarness: ३१ मे रोजी 'जागतिक तंबाखू निषेध दिन' साजरा केला जातो. यावेळी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. तंबाखू सोडणं इतकं कठीण का असतं? आणि त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करू शकता? हे जाणून घ्या.
सुरुवात नेहमीच लहान प्रमाणात होते. तणाव कमी करण्यासाठी, सामाजिक प्रसंगात, किंवा केवळ सवयीने. पण तंबाखूला प्रमाणाची पर्वा नसते; त्याला फक्त तुमच्यात टिकून राहायचे असते.