

World Obesity Day 2026
sakal
'१५ ते २० किलो वजन झटपट कमी करा', 'केवळ ३० दिवसांत सडपातळ व्हा', 'आमच्या डायट प्लॅनने चमत्कार', अशा भ्रामक जाहिरातींचा सध्या समाज माध्यमांवर भडिमार सुरू आहे. मात्र, या झटपट परिणामांच्या मोहात अनेक जण आरोग्य धोक्यात घालत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असल्याने त्याला त्यानुसार शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब करूनच वजन कमी करायला हवे, अन्यथा त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.