
World Osteoporosis Day 2025 | Women’s Bone Health Alert
sakal
World Osteoporosis Day Women Health Alert: वाढत्या वयाबरोबर योग्य काळजी न घेतल्यास ऑस्टिओपोरेसिस अर्थात हाडे ठिसूळ होण्याची सायलेंट किलर व्याधी सुरू होते. वयाच्या साठीनंतर होणारा हा आजार असला, तरी वयाच्या चाळीशीतच हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढत आहे. १५ टक्के लोकांना हा आजार माहितीच नाही, ७० टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन 'डी' ती कमतरता असते, यामुळे महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने अधिक असते, असे निरीक्षण अस्थिरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.