World Thalassemia Day: लग्नाआधी जोडप्याने 'ही' टेस्ट करणे अनिवार्य; पती-पत्नी बाधित असल्यास बाळालाही धोका

World Thalassemia Day: थॅलसेमिया पासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी विवाहपूर्व रक्तचाचणी अत्यावश्यक आहे.
Must Do Blood Tests Before Marriage
Must Do Blood Tests Before Marriage sakal
Updated on

World Thalassemia Day: विवाहेच्‍छूक जोडप्‍यांनी विवाहपूर्व रक्‍तचाचण्‍या केल्‍यास त्‍यांच्‍यामध्‍ये थॅलसेमिया हा आनुवंशिक रक्‍तविकार आहे की नाही, हे कळू शकते. जर असेल तर त्‍यावर वैद्यकीय समुपदेशन, उपचार घेऊन पुढील पिढीमध्ये हा विकार जाणार नाही व तो संपेल. म्‍हणून जोडप्‍यांनी थॅलसेमियाला रोखण्यासाठी केवळ जन्‍मकुंडलीच नव्‍हे, तर ही आरोग्‍यकुंडली असलेली रक्तचाचणी व समुपदेशन करावे, असे आवाहन रक्‍तविकारतज्‍ज्ञांनी केले.

थॅलसेमिया हा एक आनुवंशिक (जेनेटिक) रक्ताशी संबंधित विकार आहे. रक्तात ऑक्सिजन वाहून नेणारा हिमोग्लोबिन घटक शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होऊ शकत नाही. या आजारामुळे रुग्णाला सतत रक्ताच्या कमतरतेचा (अ‍ॅनिमिया) त्रास होतो. त्‍यासाठी रुग्‍णाला ठराविक कालावधीने वारंवार रक्‍तसंक्रमण करावे लागते. या आजाराबाबत जनजागृती करण्‍यासाठी दरवर्षी ८ मे हा जागतिक थॅलसेमिया दिन पाळण्‍यात येतो.

आई-वडिलांकडून मुलांना

- थॅलसेमिया हा आजार जन्मजात असून, तो आई-वडिलांकडून आनुवंशिकतेने मुलांमध्‍ये येतो.

- दोन्ही पालकांना थॅलसेमिया असेल, तर मुलांनाही गंभीर स्‍वरूपाचा आजार होण्याची दाट शक्यता

लक्षणे

- थकवा, अशक्तपणा, त्वचा पिवळसर होणे

- कावीळ होणे, हाडांच्‍या विकृती

- श्‍वास घ्यायला त्रास होणे, हृदयाची धडधड वाढणे

उपचार

- नियमित रक्त भरणे

- वारंवार रक्‍त भरल्‍याने शरीरात लोह साचू नये म्हणून आयर्न चिलेशन थेरपी

- अस्थिमज्जा प्रत्यारोपणने (बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट) कायमचा थॅलसेमिया बरा होतो. मात्र ते लहान मुलांमध्‍ये करणे शक्‍य होते.

प्रतिबंधात्‍मक उपाय

विवाहपूर्व किंवा गर्भधारणेपूर्वी रक्‍त किंवा थॅलसेमिया चाचणी व उपचार

रुग्‍णसंख्‍या

- भारतात दरवर्षी १० ते १५ हजार थॅलसेमियाग्रस्‍त बालकांचा होतो जन्‍म

- गंभीर थॅलसेमिया मेजर रुग्‍णांची संख्‍या तीन कोटी

दोन प्रकार

1) पहिला ‘थॅलसेमिया’ सौम्य स्वरूपाचा आहे. त्‍याने फारसा शारीरिक परिणाम न होता सामान्य जीवन जगता येते.

2) दुसरा गंभीर स्वरूपाचा असून, त्‍यात हिमोग्‍लोबिन कमी होत असल्‍याने नियमित रक्त भरण्‍याची आवश्यकता

थॅलसेमिया आजाराला दूर करायचे असेल, तर प्रत्‍येक जोडप्‍याने लग्‍नाआधी किमान ‘सीबीसी’ रक्‍तचाचणी करावी. गरज पडल्‍यास पुढील तपासण्‍या करून त्‍याचे निदान करता येते. आई व वडील दोघांनाही जर तो असेल (मायनर) तर जन्‍माला येणारे बाळ हे थॅलसेमिया मेजर असण्‍याची शक्‍यता २५ टक्‍क्‍यांनी वाढते. या जोडप्‍यांना मुलांना जन्‍म घालायचा असेल तर ‘फीटल मेडिसिन’ तज्‍ज्ञांकडून गर्भाची चाचणी करता येते, तसेच बाळ ग्रस्‍त असल्‍यास गर्भपाताचा निर्णय घेता येतो. म्‍हणून याबाबत जोडप्‍यांमध्‍ये जनजागृती वाढणे गरजेचे आहे.

- डॉ. राजेंद्र पोळ, रक्‍तविकारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com