
World TB Day 2025: ड्रग रेझिस्टंट म्हणजेच औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारात मुंबईला यश मिळत आहे. पालिका क्षयरोग नियंत्रण केंद्राच्या म्हणण्यानुसार, आठ वर्षांपूर्वी औषध प्रतिरोधक क्षयरोगातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४० टक्के होती, परंतु लवकर निदान, चांगली औषधे आणि उपचारांच्या मदतीने आता औषध प्रतिरोधक क्षयरोगातून बरे होण्याचा दर ८० टक्के म्हणजेच दोन पटींनी वाढला आहे. २०२४ मध्ये मुंबईत टीबीचे ५३ हजार ६३८ नवीन रुग्ण आढळले आहेत.