Most Expensive Vegetable : जगातील सर्वात महाग भाजी माहितेय? किंमत ऐकून थक्क व्हाल! अनेक रोगांवर आहे फायदेशीर

worlds most expensive vegetable hop shoots sells for rs 85000 per kilogram know benefits
worlds most expensive vegetable hop shoots sells for rs 85000 per kilogram know benefits

Most Expensive Vegetable: भाजी खरेदी करताना आपण अनेकदा मोलभाव करतो आणि दुकानदाराने काही पैसे कमी केल्यानंतर खुष देखील होतो. जर आपल्याला भाजीपाल्याची किंमत जास्त वाटली तर ती भाजी विकत घेणही टाळतो. काही दिवसांपूर्वी हिरव्या भाज्या आणि टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते, त्यामुळे अनेकांच्या खिशावर भार पडला. दरम्यान जेव्हा आपण महागड्या भाज्यांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला हिमालयात उगवणाऱ्या केशर किंवा जंगली मशरूमची नावे लक्षात येतात. पण, एक भाजीही आहे जी किमतीच्या बाबतीत त्यांना मात देऊ शकते.

या भाजीचे नाव हॉप शूट्स (hop shoots) असं आहे, जी युरोपियन देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि ही जगातील सर्वात महाग भाजी आहे. औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भाजीची किंमत सुमारे 85 हजार रुपये प्रति किलो आहे. ही भाजी भारतात सामान्यपणे पीकवली जात नाही. हॉप-शूट्स इतकी महाग आहे की याच्या बदल्यात थेट सोन्याचे दागिने देखील खरेदी करू शकतो.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ही भाजी इतकी महाग का आहे?

हॉप-शूट्स औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत तसेच काढणीसाठी तयार होण्यासाठी याला तीन वर्षे लागतात. याशिवाय, ते तोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, कारण त्यात कोणतेही मशीन वापरले जात नाही. हॉप-शूट्स काढताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. याचा उत्पादन खर्च आणि याच्या लागवडीत घ्यावी लागणारी काळजी यामुळेच याची किंमत इतकी जास्त आहे.

worlds most expensive vegetable hop shoots sells for rs 85000 per kilogram know benefits
Neymar Injury Update : ब्राझीलला धक्का! नेमारच्या दुखापती वर आली मोठी अपडेट

हॉप-शूट्सचे आरोग्यसाठी फायदे

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ही भाजी टीबी विरूद्ध अँटीबॉडीड तयार करू शकते. याशिवाय ही भाजी चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, अटेंशन डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिडेपणा असा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. बीअर बनवण्यासाठी देखील हॉप-शूट वापरतात. हॉप-शूट्सचा वापर अनेक अन्न-पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

worlds most expensive vegetable hop shoots sells for rs 85000 per kilogram know benefits
Jitendra Awhad : "रामदेव बाबांना आई आहे… आणि ते ब्रम्हचारी…"; आव्हाडांनी करून दिली मराठी साहित्याची आठवण

Disclaimer - यापैकी कोणतेही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com