World Liver Day 2024 : यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

Yoga For Liver Health : यकृत आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. अन्नपचनाची क्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम यकृत करते.
World Liver Day 2024
World Liver Day 2024esakal

World Liver Day 2024 : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे हे फायद्याचे ठरते. दररोज योगा केल्याने आरोग्याच्या विविध समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. आजकाल यकृताचे आजार होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

यकृत आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. अन्न पचनाची क्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याचे काम यकृत करते. यकृताचे कार्य बिघडले की याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात दरवर्षी १९ एप्रिलला 'जागतिक यकृत दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोकांना यकृताच्या आरोग्याबाबत जागरूक करणे हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे.

अशा परिस्थितीमध्ये यकृताच्या समस्या आणि इतर आजार टाळण्यासाठी योगासने फायदेशीर आहेत. यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे काही योगासनांचा सराव करणे महत्वाचे आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त आपण निरोगी यकृतासाठी फायदेशीर असणाऱ्या योगासनांबदद्ल जाणून घेणार आहोत.

World Liver Day 2024
Yoga For Sleep Problems : झोपेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशीर आहे योगा; 'या' आसनांचा होईल फायदा

शलभासन

यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि हॅपेटायटिस आजार टाळण्यासाठी शलभासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्याने यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच, हे योगासन नियमित केल्याने शांत झोप लागण्यास ही मदत होते.

शलभासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा. त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांचे तळवे मांड्यांच्या आत ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे दोन्ही पाय वर करा. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे स्थिर ताठ आणि पाय एकत्र रहायला हवेत, याची काळजी घ्या. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता तुमचे कपाळ जमिनीला टेकवा आणि काही सेकंद या स्थितीमध्ये रहा. त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय खाली आणा आणि श्वास सोडा.

भूजंगासन

यकृताचे आरोग्य मजबूत ठेवण्याठी भूजंगासन अतिशय फायदेशीर योगासन आहे. यासोबतच पाठीसाठी आणि पायांच्या स्नायूंसाठी हे योगासन उपयुक्त आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्याने यकृतावर चांगला परिणाम होतो. शिवाय, यकृताच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे योगासन प्रभावी आहे.

भूजंगासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर सरळ झोपा. पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता छातीजवळ तुमचे दोन्ही हात घेऊन तळवे जमिनीला टेकवा. आता एक दीर्घ श्वास घेऊन नाभी वर करा आणि आकाशाकडे ताठ पाहा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यावर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. या योगासनाचा सराव १-२ वेळा करा.

World Liver Day 2024
Yoga For Sinus Problems : ‘या’ योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने सायनसच्या समस्येपासून मिळेल आराम

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com