Yoga For Sleep Problems : झोपेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशीर आहे योगा; 'या' आसनांचा होईल फायदा

Yoga For Sleep Problems : आजकाल अनेकांना रात्रीची झोप येत नाही. या झोप न येण्याच्या समस्येमुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते.
Yoga For Sleep Problems
Yoga For Sleep Problemsesakal

Yoga For Sleep Problems : आजकाल अनेकांना रात्रीची झोप येत नाही. या झोप न येण्याच्या समस्येमुळे मग शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे, चांगली झोप घेणे हे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.

स्क्रिनचा सातत्याने वाढलेला वापर, मोबाईलचा अतिरेक इत्यादी कारणांमुळे लोकांना रात्रीचे जागरण करण्याची जणू वाईटच सवय लागली आहे. मात्र, पुरेशी झोप न लागल्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

मात्र, झोप न येण्याचे हेच एक कारण असू शकत नाही. इतर काही कारणांमुळे ही झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी सध्याची बिघडलेली जीवनशैली देखील कारणीभूत ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने किमान ७-८ तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. मात्र, तुम्हाला ही झोप येत नसेल किंवा झोपेच्या समस्या असतील तर यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

सर्वात आधी तर रात्री फोन आणि लॅपटॉपचा वापर करणे टाळा आणि नियमितपणे योगा करायला सुरूवात करा. झोपेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

Yoga For Sleep Problems
Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या योग्य पद्धत

उत्तानासन

या योगासनाचा नियमितपणे सराव करणे, आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन तुमची झोपेची समस्या अवघ्या काही दिवसांमध्ये कमी करू शकते. नियमित सरावामुळे तुम्हाला अंथरूणावर झोपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच झोप येऊ लागते. झोपेच्या समस्या दूर होण्यासोबतच तुमच्या आरोग्याच्या समस्या ही दूर होण्यास यामुळे मदत होईल.

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. त्यानंतर, सरळ उभे राहून दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या दिशेने न्या. त्यानंतर, आता श्वास सोडताना तुमचे दोन्ही हात जमिनीवर ठेऊन पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीमध्ये रहा, आता तुमच्या शरीरात तुम्हाला ताण जाणवेल. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन नियमितपणे केल्यास तुमची झोपेची समस्या, पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या दूर होईल.

बालासन

‘चाईल्ड पोझ’ म्हणून ओळखले जाणारे हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टींनी फायदेशीर आहे. नियमितपणे हे योगासन केल्याने शारिरीक आणि मानसिक समस्या दूर होण्यास मदत होते.

जर तुम्हाला झोपेच्या समस्येने ग्रासले असेल तर रात्री अंथरूणावर झोपण्यापूर्वी बालासनाचा सराव सुरू करा. या आसनाचा सकाळी आणि रात्री झोपताना नियमितपणे सराव केल्याने चांगली झोप तर लागतेच शिवाय, पचनशक्ती सुधारते.

Yoga For Sleep Problems
Yoga For Body Pain : वाढत्या वयाबरोबर शरीराची अंगदुखी वाढलीय? मग ‘या’ योगासनांमुळे तुम्हाला मिळेल आराम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com