
post pregnancy yoga: आई होणे हे स्त्रीच्या जीवनातले अत्यंत आनंददायी वळण आहे. बाळाच्या कोडकौतुकात आई स्वत:ला विसरून जाते. शिवाय बाळाला सकस पोषण मिळावे म्हणून तिचा आहारही भरपूर आणि कॅलरीयुक्त असतो. परिणामी स्त्रीचे वजन खूप वाढते. मात्र, वजन आटोक्यात ठेवणे खूप गरजेचे असते. आणि त्यादृष्टीने योग्य आहाराबरोबरच व्यायामाचीदेखील गरज असते. बाळंतपणानंतर वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ही काही उपयुक्त योगासने.