Benefits Of Mandukasana
Benefits Of Mandukasanaesakal

Benefits Of Mandukasana : मधुमेहींसाठी रामबाण आहे मंडूकासन, दररोज केल्याने मिळतील भरपूर फायदे, जाणून घ्या सरावाची पद्धत

Benefits Of Mandukasana : मंडूकासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Benefits Of Mandukasana : आपल्या शारिरीक तंदूरूस्तीसाठी अनेक जण नियमितपणे व्यायाम, योगा आणि वर्कआऊट करताना दिसतात. याच्या सोबतच संतुलित आहाराची देखील मदत घेतात. व्यायामामध्ये जसे विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो तसेच योगामध्ये देखील विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो.

नियमितपणे योगासने करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे मंडूकासन होय. मंडूकासन हा शब्द मंडूका आणि आसन या दोन शब्दांनी बनलेला आहे. या शब्दाचा अर्थ ‘बेडूक’ असा आहे. या योगासनामध्ये शरीराची स्थिती ही बेडकासारखी दिसते.

त्यामुळे, या आसनाला मंडूकासन किंवा फ्रॉग प्रोझ असे ही म्हटले जाते. हे योगासन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात मंडूकासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे आरोग्याला होणारे फायदे कोणते?

Benefits Of Mandukasana
Yoga Tips : मानसिक अन् शारिरीक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सूखासन फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

मंडूकासन करण्याची योग्य पद्धत

  • मंडूकासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर तुमचे दोन्ही पाय वाकवून, गुडघ्यावर म्हणजेच वज्रासनात बसा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही समोर ठेवून बोटांच्या मदतीने अंगठा दाबून हाताची मुठ बंद करा.

  • दोन्ही हातांच्या मुठी एकत्र करून तुमच्या नाभीजवळ ठेवा.

  • आता श्वास सोडत मुठींच्या मदतीने पोट दाबत पुढे वाका.

  • त्यानंतर, पुढे वाकल्यानंतर, तुमच्य शरीराच्या क्षमतेनुसार काही वेळ श्वास रोखून ठेवा.

  • या स्थितीमध्ये तुमची नजर समोर ठेवा, तुम्हाला आता संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, श्वास घेत पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये या.

मंडूकासन करण्याचे आरोग्यदायी फायदे

  • मंडूकासनाचा दररोज सराव केल्याने पोटातील मांसपेशी टोन होतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

  • या आसनाचा नियमित सराव केल्याने पचनाशी संबंधित समस्या जसे की, अपचन आणि गॅस यापासून आराम मिळतो.

  • मंडूकासनाचा दररोज सराव केल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे, मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते.

  • जर तुम्ही दररोज न चुकता मंडूकासनाचा सराव केला तर, तणाव, चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.

Benefits Of Mandukasana
Yoga Tips : पाठदुखी अन् कंबरदुखीमुळे त्रस्त आहात? मग, ‘या’ योगासनांची घ्या मदत, मिळेल लवकर आराम

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com