

Benefits of Yoga in Daily Life From Yoga Mat to Better Health Fitness Mental Peace and a Balanced Lifestyle
sakal
-देवयानी एम. लाइफस्टाइल कोच
आजकाल योगवर्गाला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. भारतात कोट्यवधी लोक नियमितपणे योगासनं आणि प्राणायाम करतात. शरीराची लवचीकता वाढवतात, वजन नियंत्रणात ठेवतात. अनेक जण क्लासला जाऊन शिकतात, काही ऑनलाइन करतात, तर काही स्वतःच घरच्या घरी सराव करतात. हे सगळं निश्चितच चांगलं आहे; पण एक प्रश्न विचारावासा वाटतो, की नियमित योग सराव करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यात योग उतरतो का?