Weight Loss Diet: चमचमित पदार्थ खाऊनही कमी होतं वजन! वेट लॉस डाएटसाठी हे भारतीय पदार्थ बेस्ट

तुम्ही भारतीय जेवणातले हे पदार्थ खाऊनही वजन कमी करू शकता
Weight Loss Diet
Weight Loss Dietesakal

Keto Diet: येत्या तीन दिवसावर क्रिसमस तर आठवड्याभऱ्यानंतर न्यू इयर येतोय. तेव्हा अनेकजण सेलिब्रेशन पार्टी करतात तर काहीजण लाँग विकेंडवर फिरायला जातात. मात्र त्यासाठी फार पूर्वीपासून वेट लॉसची देखील लोकांची तयारी सुरू असते. तेव्हा आता वजन कमी करण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. तुम्ही भारतीय जेवणातले हे पदार्थ खाऊनही वजन कमी करू शकता.

कुठले भारतीय पदार्थ ठरतील डाएटसाठी बेस्ट?

तुम्ही किटो डाएटबद्दस ऐकलं आहे काय? या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश असतो जे इतर डाएटमध्ये सक्तीने बंद करण्यास सांगितले जातात. वजन कमी करायचं म्हणजे तुम्ही सर्वाधिक खात असणारे तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला तुमच्या डाएटमधून स्कीप करावे लागतील. पण केटो डाएटमध्ये याउलट असतं.

एका अहवालानुसार भारतीय संस्कृतीतील पाच पदार्थांचा केटो डाएटमध्ये समावेश करण्यात आला आहे. केटो डाएटमध्ये प्रोटीनवर जास्त फोकस असतो. या डाएटमुळे शरीरातील कार्ब्सच्या ज्वलनामुळे उर्जा निर्माण होऊन तुमची चरबी वितळण्यास मदत होते. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता.

किटो डाएट म्हणजे काय?

अलीकडे किटो डाएटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. आणि बरेच लोक ते फॉलो सुद्धा करतात. यात कमी कार्बोहायड्रेटयुक्त पजार्थांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे शरीरातील चरबीचं रुपांतर उर्जेत होतं. म्हणजे या डाएटमध्ये तुम्हाला एका दिवसात फक्त 30-50 ग्रॅम कार्बोहायड्रेट खायचे आहे.

हे पाच भारतीय पदार्थ खा

1. बटर चिकन

हा पदार्थ वेगाने तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन आणि फॅट तयार करतं. तेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही बटर चिकन बिनधास्त खाऊ शकता.

2. पनीर भुर्जी

शाकाहारी लोकांच्या सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर भुर्जी. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या आकडेवारीनुसार कॉटेज चीजच्या 100 ग्रॅम भागामध्ये फक्त 3.4 ग्रॅम कार्ब्स आणि 11 ग्रॅम प्रोटीन असतात.

3. पालक पनीर

पालक पनीर बहुतेकांना आवडतं. USDA च्या आकडेवारीनुसार 100 ग्रॅम पालकमध्ये फक्त 3.6 ग्रॅम कार्ब्स असतात. त्यामुळे किटो डाएटनुसार वजन कमी करण्यासाठी पालक पनीर बेस्ट डिश आहे.

Weight Loss Diet
Heightwise Weight Chart: वयानुसार तुमचं वजन किती असावं? एका क्लिकवर वाचा शासनाने जाहीर केलेला चार्ट

4. दाल मखणी

किटो डाएटमधील अजून एक भारतीय डिश म्हणजे दाळ मखनी.

5. किटो डोसा

भारतात असंख्य लोक आहेत. ज्यांना डोसा हा पदार्थ खूप आवडतो. जर तुम्ही कार्ब्सयुक्त तांदळाच्या पिठाऐवजी लो कार्ब्स बदामाच्या पिठाचा वापर केल्यास तुम्ही लवकर वजन कमी करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com