
Young Woman Defeats Blood Cancer After Two-Year Battle, Finally Sleeps Peacefully for 8 Hours Straight
sakal
Blood Cancer Survivor Story: काळेवाडीतील २४ वर्षांच्या सायलीला (नाव बदललेले) रात्रंदिवस सारखे अंग खाजवू लागले, ज्यामुळे तिला सलग दोन तासांचीही झोप न मिळण्याचा त्रास झाला. पुढे मानेवर गाठ आल्याने तिला फिजिशियनकडे पाठवण्यात आले. तिथल्या तपासणीतून तिला 'हॉजकिन्स लिम्फोमा' या रक्त आणि ग्रंथीशी संबंधित कर्करोगाचे निदान झाल्याचे समजले. मात्र, केमोथेरपीने तिचा त्रास लवकरच कमी झाला आणि तिने दोन वर्षांनंतर प्रथमच शांतपणे पूर्ण झोप घेतली.