Bad Habits : खाण्याशी संबंधित 'या' 5 सवयींनी वाढतं तुमचं वजन, आजच सोडा या सवयी नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bad Habits

Bad Habits : खाण्याशी संबंधित 'या' 5 सवयींनी वाढतं तुमचं वजन, आजच सोडा या सवयी नाहीतर...

Weight loss tips : हल्ली वजन वाढण्याच्या समस्येने बरेच लोक त्रस्त आहेत. मात्र तुमच्या खाण्यासंबंधिच्या चुकीच्या सवयींनी तुमचं वाढू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय? आज आपण खाण्यासंबंधिच्या वाईट सवयी जाणून घेणार आहोत.

१. लवकर आणि घाईत जेवणे

लवकर आणि घाईघाईत जेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र हळूहळू या सवईंनी तुमचे वजन वाढायला सुरूवात होते. घाईघाईत तुम्ही बरेचदा असे जेवण जेवता जे अनहेल्दी असतं. फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट शूगर असते. ज्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. (Weight Loss)

घाईघाईत जेवल्याने शरीरातील कार्टिसोल वाढतं. कार्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन आहे. जो तुमच्या कंबर आणि पोटाच्या भागाची चरबी वाढते. म्हणून जेवण सावकाश करावे.

हेही वाचा: Bad habit Of drinking Water After Tea: चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा नाहीतर..

२. टीव्ही बघत खाणे

तुम्ही जेवण करताना टीव्ही बघत जेवता काय? मात्र तुमच्या या सवयीने वजन वाढू शकतं. तुमच्या खाण्याचा आनंद त्याने कमी होतो.

तसेच टेबलवर बसून जेवण करू नये. टीव्ही आणि कंप्युटर स्क्रीनसमोर जेवण करू नये. शक्य असेल तर अशा ठिकाणी जेवण करा जे टीव्हीपासून दूर असेल. जेवणाला बसण्याआधी इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस बंद करा.

३. जेवणाच्या भांड्यांचा आकार

एका संशोधनातून असे पुढे आले आहे की तुमच्या खाण्याच्या थाळीचा आकार तुमच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतो.

हेही वाचा: Stress Free Life : आयुष्यभर राहायचे असेल आनंदी तर ही कामे करा

४. दुसऱ्यांसोबत खाणे

एका संशोधनातून असे पुढे आले आहे की एकटे खाण्याच्या तुलनेत इतरांसोबत जेवल्यास कॅलरीज जास्त वाढतात. तसेच सोशल इव्हेंट्समध्ये लोक जास्त जेवतात. ब्राउन राइस आणि ब्रोकलीचे सेवन जास्त करावे.

स्ट्रेसमध्ये खाणे

अनेकजण स्ट्रेसमध्ये असताना जास्त जेवण करतात. होऊ शकतं की तुम्ही एक मोठं बाउल आयस्क्रिमही खाऊन घ्याल. याने तुमच्या शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढू शकते.