भविष्य

मेष:
काहींना गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
वृषभ:
आर्थिक कामे मागीं लागतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.
मिथुन:
मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
कर्क:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
सिंह:
विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य चांगले राहील.
कन्या:
व्यवसायातील महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.आरोग्य चांगले राहील.
तूळ:
जिद्द व चिकाटी वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक:
मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नये. संततिसौख्य लाभेल.
धनु:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर:
भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.
कुंभ:
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.
मीन:
महत्त्वाची कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल.
रविवार, जुलै 5, 2020 ते शनिवार, जुलै 11, 2020
मेष:
आजची पौर्णिमा भाग्योदयाची कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुभ्रमणाच्या विशिष्ट अवस्थेतून आजची पौर्णिमा न दिसणाऱ्या ग्रहणाची असली तरी अपवादात्मक परिस्थितीतून भाग्योदयाचीच. एकूणच, सप्ताह उभारी आणणारा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार घरात आनंदोत्सवाचा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मित्रसंगतीतून मनःस्तापाचा.
वृषभ:
जुन्या गुंतवणुकींतून लाभ राशीचा शुक्र पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम फलदायी. मात्र, सट्टेबाजी किंवा जुगार टाळा. ता. सहा ते आठ हे दिवस शुभ ग्रहांच्या साथसंगतीचेच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ. हा सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना काहीसा स्त्रीविरोधी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. शनिवार वेदनेचा.
मिथुन:
मानसिक संतुलन सांभाळा आजचं न दिसणारं चंद्रग्रहण मानसिक पातळीवरून काहीसं त्रासदायक. सतत गैरसमज होतील. घरातील उपकरणं दगा देतील. घरातील पाहुण्यांची चिंता सतावेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह नातेवाइकांकडून चिंतेचा किंवा कटकटींचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. नऊ व दहा हे दिवस गुरुकृपेच्या वर्षावाचे. पुत्रोत्कर्ष. नोकरीत लाभ. सामाजिक गौरव.
कर्क:
व्रात्य मुलांची काळजी घ्या हा सप्ताह जनसंपर्कातून खराब राहील. आजचं न दिसणारं चंद्रग्रहण काहींना लोकापवादातून त्रासाचं. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. मंगळवार कलहजन्य. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह पोटाच्या व्याधींतून त्रासाचा. घरातील व्रात्य मुलांची काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नोकरीत शुभदायक काळ.
सिंह:
प्रत्येक दिवस नावीन्यपूर्ण! या सप्ताहात नामांकन घेणारी रास! प्रत्येक दिवस नावीन्यपूर्ण राहील. व्यवसायाचे उत्तम पर्याय उपलब्ध होतील. परदेशस्थ तरुणांच्या चिंता मिटतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांद्वारे सतत चर्चेत राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील बढती चकित करेल! मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी काळजी घ्यावी. प्रवासात जपावं. धडपडू नये.
कन्या:
पोलिसांशी हुज्जत नको अतिशय अपवादात्मक स्वरूपाचं ग्रहमान. सप्तमस्थ मंगळाची दहशत राहील! सार्वजनिक घटक-गोष्टींतून त्रासाचाच सप्ताह. पोलिसांशी हुज्जत नको. आजची ग्रहणयुक्त पौर्णिमा हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर खराब. बाकी सात व आठ जुलै हे दिवस शुक्रभ्रमणातून उत्तम. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ.
तूळ:
गुप्त चिंता दूर होईल सप्ताहातील ग्रहगणित न दिसणाऱ्या चंद्रग्रहणात विचित्र लक्षणं दाखवू शकतं. मंगळाचं उपद्रवमूल्य राहील. एखादा खलनायक सतावेल. बाकी, गुरुभ्रमणाची स्थिती विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय तारक राहील. नऊ व दहा हे दिवस प्रसन्नतेचा अनुभव देतील. नोकरीत लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. सरकारी लाभ.
वृश्चिक:
वृद्धांची काळजी घ्या आजची ग्रहणयुक्त पौर्णिमा घरात अशांततेची. घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी, सप्ताहातील शुक्रभ्रमणाचा अंडरकरंट राहीलच. व्यावसायिक लॉकडाउन उठेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट श्रीमंताच्या यादीत नेईल! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार विशिष्ट सुवार्तांचा. आनंदाश्रू अनावर होतील. मात्र, पित्तप्रकोपापासून जपा. पथ्य पाळा.
धनु:
विचित्र मनोव्यथा सतावतील आजचं न दिसणारं चंद्रग्रहण अंतर्मनात जाणवेल! तरुणांना विचित्र मनोव्यथा सतावतील. काहींना प्रेमभंगाचा चटका अस्वस्थ करेल. बाकी, सप्ताहातील गुरुभ्रमणाची विशिष्ट स्थिती उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेनंतर उत्तम फलदायी होईल. एखादं शुक्‍लकाष्ठ संपेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. गुरुवार भाग्याचा.
मकर:
छंद-उपक्रमांतून प्रसिद्धियोग या सप्ताहात वक्री ग्रहांचा ताण वाढेल. विशिष्ट वादग्रस्त प्रकरणं सतावतील. आजचं न दिसणारं चंद्रग्रहण घरात अशांततेचं. काहींना भाऊबंदकीतून त्रास. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाचा अंडरकरंट चांगलाच ओलावा देईल! तरुणांना छंद-उपक्रमांतून प्रसिद्धियोग. ता. सहा व सात हे दिवस अतिशय शुभलक्षणी.
कुंभ:
परदेशी तरुणांचा भाग्योदय न दिसणाऱ्या आजच्या चंद्रग्रहणातून काही तरुणांना विचित्र नैराश्‍य येऊ शकेल. प्रेमप्रकरणांतून त्रास. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमरोगाची बाधा. बाकी, गुरू-शुक्राची भ्रमणं पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पडद्यामागून सहकार्य करतील. गुरुवार मोठ्या यशाचा. परदेशी तरुणांचा भाग्योदय.
मीन:
कोणत्याही वादात पडू नका आजची ग्रहणयुक्त पौर्णिमा राशीच्या मंगळाचं उपद्रवमूल्य वाढवेल. कोणत्याही वादात पडू नका. आजूबाजूच्या राजकारणी व्यक्तींपासून उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सावध राहावं. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचा अंडरकरंट चांगलाच फलदायी होईल. शैक्षणिक यश मिळेल. एखादा नवस फेडाल. और क्‍या!

ताज्या बातम्या