भविष्य

मेष:
तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.
वृषभ:
चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन:
आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज तुमचे कशातही लक्ष लागणार नाही. काहींना नैराश्‍य जाणवेल.
कर्क:
दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह:
मानसिक स्वास्थ्य कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे.
कन्या:
मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. जिद्दीने कार्यरत राहणार आहात.
तूळ:
आशावादीपणाने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायातील कामे विनासायास पूर्ण होतील.
वृश्चिक:
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.
धनु:
काहींना अचानक धनलाभ संभवतो. उधारी, उसनवारीची कामे पूर्ण होतील. प्रवास सुखकर होणार आहेत.
मकर:
चिकाटी वाढणार आहे. अनेक कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ:
मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.
मीन:
काहींना विविध लाभ होतील. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. प्रवास सुखकर होतील.
रविवार, जानेवारी 19, 2020 ते शनिवार, जानेवारी 25, 2020
मेष:
मुला-बाळांचं भाग्य उलगडेल राशीचा हर्षल अमावास्येच्या आसपासच्या काळात विचित्र घटना घडवू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वादग्रस्त ठरू नका. काळजी घ्या. बाकी, भरणी नक्षत्राच्या व्यक्ती गुरुभ्रमणाचा एक सुंदर टप्पा अनुभवतील. मुला-बाळांचं भाग्य उलगडेल. तपस्येला फळ येईल. बाकी, अमावास्येच्या आसपासच्या काळात ओव्हरटेक करणं टाळा. वाहन चालवताना उगाच कुणाशी स्पर्धा नको.
वृषभ:
ओळखी-मध्यस्थींतून लाभ हा सप्ताह तरुणांना उत्तमच. शुक्रभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर काही अपवादात्मक यश मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींना यश. ओळखी-मध्यस्थींतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. घरातल्या वृद्धांची काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपासच्या काळात प्रवासात काळजी घ्यावी.
मिथुन:
व्यावसायिक येणी येतील गुरुभ्रमणाचा प्रभाव वाढेल. ता. २२ व २३ रोजी नववर्षाची भेट मिळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ घेतील. काहींना परदेशगमनाची संधी. व्यावसायिक येणी येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात स्त्रीहट्टाला सामोरं जावं लागेल. अन्न-पाण्यातल्या संसर्गाविषयी काळजी घ्या.
कर्क:
आर्थिक व्यवहार जपून करा शनीचं राश्‍यंतर अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होत आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कोणताही जुगार नको. पत्नीशी गोड बोला. कोणतीही संशयग्रस्तता टाळा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना भाऊबंदकीतून त्रास होण्याची शक्यता. विद्युत-उपकरणांपासून जपा.
सिंह:
विवाहस्थळांकडे लक्ष द्या सध्या तुम्हाला शुभग्रहांची उत्तम साथ मिळत आहे, त्यामुळे सप्ताहाची सुरवात छानच राहील. तरुणांनो, विवाहस्थळांकडे लक्ष द्या. नोकरीच्या उत्तम संधी येतील. ता. २२ व २३ हे दिवस भाग्योदयाचे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं सौंदर्य उठून दिसेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या शनीच्या राश्‍यंतरामुळे विशिष्ट गुप्त चिंतेची.
कन्या:
नोकरीत प्रशंसा होईल या सप्ताहाची सुरवात तरुणांसाठी उत्तमच. विशिष्ट मुलाखती यशस्वी होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठी प्राप्ती. वादग्रस्त खटली मिटतील. गुरुवार गुरुकृपेचा. नोकरीत प्रशंसा होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या घबाडयोगाची. हरवलेलं सापडेल!
तूळ:
नोकरीत वरिष्ठांशी जपून शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट लाभ मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ ते २३ या काळात शुभ ग्रहांचं बळ मिळेल. वैयक्तिक महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अमावास्येच्या आसपासचा काळ तुमच्या राशीला प्रतिकूल. वादविवाद टाळा. नोकरीत वरिष्ठांशी जपून.
वृश्चिक:
अडचणी दूर होतील शनीच्या राश्‍यंतरातून शुभ ग्रहांना वाव दिला जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या अडचणी या सप्ताहाच्या प्रारंभी दूर होतील. ता. २० रोजीची एकादशी अतिशय शुभलक्षणी. नोकरीत भाग्योदय. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा गुरुवारी भाग्योदय. अमावास्येच्या आसपासच्या काळात वाहनं जपा.
धनु:
घरात वादविवाद नकोत या सप्ताहात राशीचा गुरू चमत्कार घडवेल. ता. २२ व २३ हे दिवस संकटविमोचनाचे. तरुणांना मोठं यश मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी वा विवाह यासंदर्भात विशेष संधी. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या आसपासच्या काळात घरात वादविवाद टाळावेत. काहींना अग्निभय. विद्युत उपकरणांपासून काळजी घ्या.
मकर:
जुन्या गुंतवणुकींतून लाभ सप्ताहाचा आरंभ वैयक्तिक सुवार्तांचाच. तरुणांना ता. २० ची एकादशी अतिशय शुभलक्षणी. नोकरीचे कॉल येतील. व्यावसायिक येणी येतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीचा लाभ घेतील. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. अमावास्येच्या आसपासच्या काळात शनीचं प्रशासन सुरू होईल. गर्दीत काळजी घ्या.
कुंभ:
जिवलगांचे प्रश्न सुटतील राशीचं शुक्रभ्रमण आणि गुरूची स्थिती यांचा या सप्ताहावर मोठा प्रभाव राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती या स्थितीचा पूर्णपणे लाभ घेतील. घरातल्या प्रिय व्यक्तींचे प्रश्‍न मार्गी लागतील. ता. २२ व २३ हे दिवस सर्वार्थानं शुभदायी. शनीच्या राश्‍यंतरामुळे अमावास्येच्या आसपासच्या काळात गुप्त चिंता सतावेल.
मीन:
नोकरीतली अस्वस्थता जाईल हा सप्ताह गुरुभ्रमणातून फलदायी होणारा. नोकरीतली अस्वस्थता जाईल. पुत्र-पौत्रांचा भाग्योदय होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची पतप्रतिष्ठा वाढेल. ता. २२ व २३ रोजी पूर्वसंचित फळाला येईल. अमावास्येच्या आसपासच्या काळात अचानक पाहुणे येतील.

ताज्या बातम्या