भविष्य

मेष:
प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. काहींची धार्मिक प्रगती होईल.
वृषभ:
जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढेल. बौद्धिक व कला क्षेत्रात लाभ होतील. मनोबल उत्तम.
मिथुन:
सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
कर्क:
नवा मार्ग दिसेल. अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य सुधारेल. मानसिक ताणतणाव कमी.
सिंह:
दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवास टाळावेत.
कन्या:
आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढेल.
तूळ:
हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनावश्‍यक खर्चांचा सामना करावा लागेल.
वृश्चिक:
कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. प्रवास होणार आहेत.
धनु:
सौख्यकारक घटना घडतील. आरोग्य उत्तम असणार आहे. सर्वत्र सामंजस्य राहील. मानसिक स्वास्थ्य उत्तम.
मकर:
मनोबल उत्तम राहील. आत्मविश्‍वासपूर्वक पावले टाकाल. तुमच्या व्यवसायात सुयश मिळवाल.
कुंभ:
व्यवसायामध्ये अनपेक्षित धनलाभ संभवतो. उधारी वसूल होईल. चिकाटी वाढेल. मनोबल उत्तम राहील.
मीन:
तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. चिकाटी वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
रविवार, मार्च 22, 2020 ते शनिवार, मार्च 28, 2020
मेष:
अवसानघातकी निर्णय नकोत या सप्ताहात मंगळ राशीच्या दशमस्थानात येऊन शनी-मंगळाचं एक पर्व सुरू होत आहे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आगामी आठ- दहा दिवसांच्या काळात विशिष्ट अपवादात्मक स्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. अवसानघातकी निर्णय नकोत. सार्वजनिक जीवनात वादविवाद टाळावेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या माध्यमातून अतिशय सुंदर!
वृषभ:
सर्वतोपरी काळजी घ्या शुक्राचं राश्‍यंतर शनिवारी विलक्षण भाग्योदयाची चाहूल देणारं. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी लाभ घेण्यासाठी सज्ज राहावं. बाकी, हा सप्ताह अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधेचा. सर्वतोपरी काळजी घ्या. जागरण करावं लागण्याची शक्यता. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विचित्र मानसिक गोंधळाचा. गुप्त चिंता सतावू शकते.
मिथुन:
आततायीपणा करू नका ता. २३ व २४ चं अमावास्येचं प्रभावक्षेत्र विचित्र ग्रहपार्श्‍वभूमीचं. जागरूक राहा. शनी-मंगळाची व्यूहरचना सुरू होत आहे. कोणताही आततायीपणा नको. अपघातासंदर्भात काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्व प्रकारे आचारसंहिता पाळावी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मोठ्या दैवी प्रचीतीचा. पुत्रोत्कर्ष. विवाहयोग.
कर्क:
परिस्थितीचं भान ठेवा या सप्ताहात मंगळाचं सप्तम स्थानात आगमन होत आहे. शनी-मंगळाची व्यूहरचना युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकते. नैसर्गिक घटना-परिस्थितीमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी भान ठेवून वागावं. ता. २६ व २७ हे दिवस कुयोगांच्या उच्च दाबाचे. विद्युत्‌-उपकरणांपासून काळजी घ्यावी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार शुभ. सुवार्ता मिळेल.
सिंह:
‘छप्पर फाड के’ लाभ ता. २३ व २४ चं अमावास्येचं प्रभावक्षेत्र मंगळाच्या राश्‍यंतराच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय दखलपात्र. अमावास्या व्याधिग्रस्तांच्या संदर्भातून संवेदनशील. पथ्यं पाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहयोगांतून चमत्काराचा! मघा आणि पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी ‘छप्पर फाड के’ लाभ होईल!
कन्या:
निराशा येऊ देऊ नका या सप्ताहात मानसिक आरोग्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. ता. २३ व २४ हे अमावास्येचं क्षेत्र वागण्या-बोलण्यांतून बेरंग करणारं. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी नैराश्याचा सामना खंबीरपणे करावा. बाकी, सप्ताहाच्या शेवटी नोकरी-व्यवसायातल्या मंडळींना विशिष्ट संधी मिळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनयोग. उत्तरा नक्षत्राच्या कलाकारांचा भाग्योदय.
तूळ:
नोकरीतील बदली लाभदायक विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी गुरू-शुक्र शुभयोगाच्या पॅकेजचा लाभ होईल. मोठे करारमदार होतील. नोकरीत बदलीतून लाभ. मंगळाचं राश्‍यंतर चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात त्रासदायक. स्त्रीवर्गाशी वाद नकोत. शनिवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा. वास्तुयोग.
वृश्चिक:
गैरसमज होऊ देऊ नका नवसंवत्सरारंभाचा सप्ताह तुमच्या राशीला एकूणच शुभसूचक! अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. गुरू-शुक्राची स्थिती ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक लाभ देणारी. मात्र, मंगळाचं राश्‍यंतर अमावास्येच्या आसपासच्या काळात वादात ओढणारं. गैरसमज होऊ देऊ नका. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती रम्य संध्याकाळचा अनुभव घेतील, शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य अनुभवतील.
धनु:
वास्तूचे व्यवहार होतील अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होणारं मंगळाचं राश्‍यंतर वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर काही लक्षणं दाखवेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या मानसिक गोंधळाची. बाकी, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राच्या शुभयोगातून अप्रतिम लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मान-सन्मानाचा. महत्त्वाच्या गाठी-भेटी. वास्तूचे व्यवहार मार्गी लागतील.
मकर:
अद्वितीय फळं मिळतील आज तुमच्या राशीत मंगळाचं आगमन होत आहे. या सप्ताहात तुमच्या बाबतीत एक वेगळी घटना अस्तित्वात येणार आहे. श्रद्धेनं आणि सचोटीनं वागणाऱ्या मंडळींना हा सप्ताह अद्वितीय फळं देईल. काहींचं पूर्वसंचित गुरू-शुक्राच्या स्थितीनं फलद्रूप होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अप्रतिम. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार बॅड डे! जनसंपर्क टाळलेलाच चांगला.
कुंभ:
आचारसंहिता पाळाच! मंगळाचं राश्‍यंतर होऊन ग्रहांची एक नवी रचना अस्तित्वात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना ही रचना कडक आचारसंहिता पाळायला लावणार आहे. ता. २३ व २४ हे अमावास्येचं प्रभावक्षेत्र शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना काहीशा अस्वस्थतेचं. काळजी घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र शुभयोग. शनिवारी प्रसन्नतेचं वातावरण राहील.
मीन:
व्यवसायात मोठे लाभ सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती अतिशय शुभ राहील. अमावास्येचं प्रभावक्षेत्र सोडल्यास सप्ताह खास फळं देईल. राशीतील अमावास्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य. सर्वतोपरी काळजी घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय. व्यवसायात मोठे लाभ होतील.

ताज्या बातम्या