भविष्य

मेष:
आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृषभ:
अनावश्‍यक कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.
मिथुन:
मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह:
नवनवीन सुसंधी लाभतील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या:
काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तूळ:
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक:
मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनु:
मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर:
व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ:
जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन:
कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Sunday, November 22, 2020 to Saturday, November 28, 2020
मेष:
व्यावसायिक वसुली होईल मेष : या सप्ताहात ग्रहांचं फील्ड शुक्र ताब्यात घेणार आहे, याचा तुम्हाला पूर्णपणे लाभ होईल. अश्र्विनी नक्षत्राच्या तरुणांना एक पॅकेज घोषित होईल. ता. २६ ते २९ हे दिवस चमत्कार घडवतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची प्रेमप्रकरणात प्रगती. व्यापाऱ्यांची व्यावसायिक वसुली.
वृषभ:
व्यावसायिक प्रलोभनं टाळा वृषभ : शनी-गुरू सहयोगामुळे कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात आश्र्वासक राहील. थोरा-मोठ्यांच्या ओळखीतून लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती मौज-मजा अनुभवतील. सुवार्ता कळतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक प्रलोभनं टाळावीत. बाकी, पतीचा वा पत्नीचा भाग्योदय.
मिथुन:
नोकरीत मान-मरातब वाढेल मिथुन : शुक्रभ्रमणाचं एक पॅकेज अस्तित्वात राहील. विवाहेच्छूंना अतिशय अनुकूल सप्ताह. विवाहस्थळांचा भर वाढेल. संधी दवडू नका. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची चलती राहील. प्रत्येक ठिकाणी आगतस्वागत होईल. नोकरीत मान-मरातब वाढेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारणी व्यक्तींशी काळजीपूर्वक वागावं.
कर्क:
मोठे प्रकल्प हाती घ्याल कर्क : शुक्रभ्रमण सप्ताहभर कलांनी समृद्ध होत जाईल. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. मोठे प्रकल्प हाती घ्याल. काहींचे वास्तुविषयक व्यवहार होतील. ता. २६ ते २८ हे दिवस अतिशय शुभ. पुष्य नक्षत्राच्या आणि पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती चांगलाच लाभ उठवतील. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं कोर्टप्रकरण मार्गी लागेल.
सिंह:
परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय सिंह : हा सप्ताह तरुणांना मोठा बूस्टर डोस देणारा, ऑनलाईन क्‍लिक होणारा. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह अभूतपूर्वच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक वाद संपतील. सप्ताहाचा शेवट अतिशय लाभदायक. मात्र, संसर्गजन्य बाधा होणार नाही याची काळजी घ्याच.
कन्या:
व्यवसायातील मरगळ हटेल कन्या : हा सप्ताह शुभग्रहांच्या स्पंदनांचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. व्यावसायिक मरगळ पूर्णतः जाईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थीतून लाभ. ता. २५ व २६ या दिवशी महत्त्वाची कामं होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी हाता-पायाची काळजी घ्यावी.
तूळ:
प्रेमप्रकरण मार्गी लागेल तूळ : स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचा दिवाळीचा आनंद पुढचे अनेक दिवस टिकेल. दिवाळी रेंगाळत राहील! अर्थातच, राशीच्या शुक्रकलांच्या समृद्धीतून हे घडेल. संधींचा लाभ घ्याच. प्रेमप्रकरण मार्गी लागेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक सुवार्ता कळतील. धमाल उडेल! ता. २६ ते २८ हे दिवस एकूणच उत्तम पॅकेज बहाल करणारे.
वृश्चिक:
सामाजिक बहुमान मिळेल वृश्र्चिक : विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नवी जीवनदृष्टी येईल. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. सामाजिक बहुमान मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह मौजमजेचा. प्रिय व्यक्तींचा उत्कर्ष. ता. २४ ते २६ हे दिवस भावरम्य राहतील. नवपरिणितांचा भाग्योदय.
धनु:
व्यवसायात मोठं यश धनू : वैयक्तिक सुवार्ता मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची या सप्ताहाची सुरुवात अतिशय सुंदर राहील. तरुणांच्या ऑनलाइन मुलाखती यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ ते २८ हे दिवस अतिशय प्रवाही. व्यावसायिक उलाढाली यशस्वी होतील. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय.
मकर:
सुवार्तांचा, प्रसिद्धीचा सप्ताह मकर : तुमच्या राशीला सध्या शुभ ग्रहांच्या पॅकेजचा उत्तम लाभ घडत आहे, त्यामुळे दिवाळीचा आनंद रेंगाळत राहील. अर्थातच सुवार्तांच्या पार्श्वभूमीवर! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताह पर्वणीसारखाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धियोग. ता. २६ ते २८ हे दिवस तुमच्या राशीला अभूतपूर्व संधी देणारे.
कुंभ:
तरुणांची उमेद वाढेल कुंभ : सप्ताहातील चंद्र-शुक्रांच्या कला तुमच्या राशीला उत्तमच राहतील. तरुणांची उमेद वाढेल. व्यावसायिकांना विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होईल. मात्र, कायदेशीर बाबी पाळाच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे कलागुण ता. २६ ते २८ या दिवशी बहरतील. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील.
मीन:
भावनोद्रेक टाळावा मीन : फक्त फील्डवर टिकून राहा. नका काढू धावा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना संयमी वागण्याचं फळ मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गाठीभेटींतून फलदायी. बाकी, रेवती नक्षत्राच्या तरुणांनी भावनोद्रेक टाळावा. नवपरिणितांनी जपावं. घरातील वृद्धांशी वाद नकोत.

Tajya Batmya