भविष्य

मेष:
आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ:
वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन:
जिद्द व चिकाटी वाढेल.आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
कर्क:
मन आनंदी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह:
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.
कन्या:
एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तूळ:
आत्मविश्‍वास वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:
संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. अनुकूलत लाभेल.
धनु:
महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. नवीन परिचय होतील.
मकर:
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ:
काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन:
मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.
Sunday, April 11, 2021 to Saturday, April 17, 2021
मेष:
सुंदर घडामोडींचा कालखंड मेष : राशीतील शुक्राचे आगमन आणि गुरूची विशिष्ट स्थिती यंदाची जीवनातील गुढी उभारेल. तरुणांनो, निःसंशय फायदा घ्या. आलेल्या संधी स्वीकारा. आश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट जीवनातील सुंदर घडामोडींचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवारच्या अमावास्येचं फिल्ड मानसिक अशांततेचं. स्त्रीशी जपून.
वृषभ:
नूतन वास्तूचे स्वप्न साकारेल वृषभ : सप्ताहात मंगळ राशीतून हालतोय. या सप्ताहात कोरोनाचं मळभ जाईल. आजचा रविवार रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तींकडून सुखावणारा. नूतन वास्तूचं स्वप्न सप्ताहामध्ये साकारेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या घबाडसदृश फळ देईल. नोकरीत चमत्कार अनुभवाल. पगारवाढ होईल !
मिथुन:
विवाहाच्या हालचालींना वेग येईल मिथुन : सप्ताह अतिशय ऐतिहासिक स्वरूपाची फळं देईल. तरुणांवरचे कोरोनाचे मळभ जाऊन विवाहाच्या हालचाली जोर धरतील. प्रेमाचे अँटिने स्वच्छ ठेवा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात खऱ्या अर्थानं वसंतागमन. लव्ह बर्डस् एकत्र येतील. यंदाचा गुढीपाडवा पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या आर्थिक उत्कर्षाची चाहूल देईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी!
कर्क:
गुढीपाडवा धनवर्षावाचा कर्क : आजचा रविवार मोठा भाग्यसूचक. सप्ताहात व्यावसायिकांची गुढी उभारली जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. काहींना सरकारी साह्य मिळेल. तरुणांना सप्ताह कलागुणांचा उत्कर्ष करणारा. कोरोनाचा सूर आळवणं संपेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी यंदाचा गुढीपाडवा धनवर्षावाचा ठरेल. मात्र शनिवार गर्दीत सांभाळा.
सिंह:
भाग्योदयाचा कालखंड सिंह : सप्ताहात आपला शेअर एकदम वधारणार आहे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह पर्वणीसारखाच. नोकरी, शिक्षण किंवा विवाह या जीवनाच्या त्रिसूत्रीतून भाग्योदय दाखवतो. सिक्वेन्स लावाच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी मात्र अमावास्या सांभाळावी आणि गुढीपाडव्यानंतर आपले लॉकडाउन घालवावे. ता. १६ चा शुक्रवार आपणास भन्नाटच.
कन्या:
मान सन्मान लाभेल कन्या : सप्ताहात ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट खूपच बदलतेय ! सप्ताहातील ग्रहांची राश्‍यंतरे तत्काळ परिणामस्वरूप होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नोकरी-व्यावसायिक बाबींतून कायदेशीर घटक-गोष्टी सांभाळाव्यात. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार वैवाहिक जीवनातून शुभ. उद्याचा सोमवार चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सन्मानाचा !
तूळ:
परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय तूळ : मंगळ-शुक्राची राश्‍यंतरे तत्काळ फलदायी होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाचा गुढीपाडवा संस्मरणीय राहील. विवाहाचे निर्णय घ्याल. ता. १४ चा बुधवार मोठ्या उत्तम घडामोडींचा. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची सोमवारची संध्याकाळ व्यावसायिक उत्कर्षाची. शनिवार नोकरी देणारा असेल.
वृश्चिक:
बेकारांना नोकरीचा योग वृश्‍चिक : सप्ताहात ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट बदलतेय. आर्थिक व्यवहार करताना जपून. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह आर्थिक प्रलोभनांचा. बाकी ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार घबाडयोगाचा. बेकारांना नोकरी. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींकरिता आजचा रविवार पुत्रोत्कर्षाचा. सप्ताहात मौल्यवान वस्तू जपा.
धनु:
प्रेमिकांचा वसंत फुलेल धनु : यंदाचा गुढीपाडवा मूळ नक्षत्रास मोठे शुभ संकेत देणाराच. तरुणांचे एक सुंदर शैक्षणिक पर्व सुरू होईल. ता. १३ व १४ हे दिवस मुहूर्तमेढ करणारे. प्रेमिकांचा वसंत फुलेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तीची एखादी पनवती संपेल. एकूणच आपल्या राशीस सप्ताहाचा शेवट गोड राहील.
मकर:
मोठ्या चमत्काराची अपेक्षा मकर : सप्ताहात शुक्राचे भ्रमण एक ट्रॅक पकडेल. अर्थातच हा ट्रॅक सुगंधीत लहरींचेच प्रसारण करेल. घरात आनंदमय वातावरण राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कोरोनाच्या काळातही संजीवनी हस्तगत होईल. मात्र सप्ताहाच्या शेवटी भाजणं जपा. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार मोठ्या चमत्काराचा.
कुंभ:
शैक्षणिक यश मिळेल कुंभ : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड आपणास अतिशय अनुकूल होत आहे. तरुणांचे टेक ऑफ होतील. एखादे शैक्षणिक यश जबरदस्त क्‍लिक होईल. सप्ताहात प्रेमिकांची गुढी उभारली जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर वधारेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचे कोरोनाचे मळभ जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार भन्नाट ठरेल.
मीन:
जुनी गुंतवणूक फलदायी ठरेल मीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात कौटुंबिक जीवनातून छानच राहील. घरात तरुणांचे विवाह ठरतील. सप्ताह नोकरीतील स्थान बळकट करणारा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाचा गुढीपाडवा जुन्या गुंतवणुकींतून फलदायी होणारा. वास्तुविषयक खरेदी-विक्री. ता. १६ चा शुक्रवार सखीच्या प्रसन्न सहवासाचा.

Tajya Batmya