horoscope
Esakal
अनिता केळकर
मेष
व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्याल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणे, चर्चा करणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. मिळणाऱ्या सुखसुविधांचा वापर करावासा वाटेल.
वृषभ
कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात कामाची वाटचाल योग्यरितीने करण्यासाठी नवीन व्यक्तींशी संपर्क साधाल. काही अनावश्यक बदल करून खर्च कराल. योग्य ताळेबंद आखून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. घरात एखाद्या व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील.