Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 नोव्हेंबर 2021

पंचांग - गुरुवार : कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सायं. ५.२१, चंद्रास्त स. ६.३०, सूर्योदय ६.४४, सूर्यास्त ५.५५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन मध्यरात्री १.२९ नं., पौर्णिमा प्रारंभ दु. १२.०१, भारतीय सौर कार्तिक २७ शके १९४३.
Published on

पंचांग -

गुरुवार : कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सायं. ५.२१, चंद्रास्त स. ६.३०, सूर्योदय ६.४४, सूर्यास्त ५.५५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन मध्यरात्री १.२९ नं., पौर्णिमा प्रारंभ दु. १२.०१, भारतीय सौर कार्तिक २७ शके १९४३.

दिनविशेष -

२०१० - आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताच्या विजय कुमारने २५ मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले.

२०१४ - नागरिकांना बचतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आणि सरकारला विकास कार्यक्रमांसाठी पैसा उपलब्ध व्हावा, यादृष्टीने केंद्र सरकारतर्फे ‘किसान विकास पत्र’ योजना पुन्हा सुरू केली.

२०१५ - ‘राइट टू पी’ चळवळीला मान्यता मिळवून देणाऱ्या ‘कोरो’ संस्थेच्या प्रमुख मुमताज शेख यांचा ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने जगभरातील शंभर महत्त्वाकांक्षी महिलांच्या यादीत समावेश केला.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

वृषभ : दिवस फारसा अनुकूल नाही. काहींना मानसिक अस्वस्थता राहील.

मिथुन : अनेकांशी सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. फारसा उत्साह असणार नाही.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत.

धनू : प्रवास सुखकर होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

मकर : प्रॉपर्टीच्या कामास दिवस चांगला. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल.

कुंभ : जिद्दीने व चिकाटीने कामात यश मिळवाल. तुमचे कार्यक्षेत्र उत्तम राहील.

मीन : प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com