आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 नोव्हेंबर 2021

पंचांग - सोमवार : कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री ८.१३, चंद्रास्त सकाळी ९.०६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

सोमवार : कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री ८.१३, चंद्रास्त सकाळी ९.०६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९४३.

दिनविशेष -

२००४ - जम्मू-काश्‍मीरमधील संदेशवहन सुधारण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या ध्रुव उपग्रह सेवेचे लष्कराच्या उत्तर विभागाच्या मुख्यालयात उद्‌घाटन करण्यात आले. या उपग्रहाद्वारे काश्‍मीर खोऱ्यातील लष्कराची श्रीनगर, लेह, नागरोटा येथील कार्यालये मुख्यालयाशी जोडली आहेत.

२०१० - शून्य अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी तापमान आणि प्रचंड जोरात वाहणारे थंड वारे यांतून वाट काढत आठ भारतीय शास्त्रज्ञ दक्षिण ध्रुवावर पोहचले व त्यांनी तेथे तिरंगा ध्वज फडकावला. दक्षिण ध्रुवावर पोचणारे हे पहिलेच भारतीय ठरले. या शास्त्रज्ञांच्या पथकाचे नेतृत्व दिल्लीतील राष्ट्रीय अंटार्क्‍टिक व सामुद्री संशोधन केंद्राचे संचालक रसिक रवींद्र यांनी केले.

दिनमान -

मेष : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागणार आहेत.

वृषभ : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मिथुन : नवी दिशा सापडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

कर्क : आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

सिंह : तुमची कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये मनासारखे वातावरण राहील.

कन्या : मित्रांच्या आश्‍वासनावर व सहकार्यावर अवलंबून राहू नका.

तूळ : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अपेक्षित भेटीगाठी होणार.

वृश्‍चिक : वाहने चालवताना खबरदारी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : मानसिक चिंता राहील. अनपेक्षितरित्या अडचणींना तोंड द्यावे लागेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे होतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवे परिचय होतील.

मीन : काहींना नको त्या ठिकाणी बदलीवर जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com