आजचे पंचाग ६ नोव्हेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

आजचे पंचाग ६ नोव्हेंबर २०२२ आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

रविवार : कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दु. ४.४१, चंद्रास्त प. ५.२४, वैकुंठ चतुर्दशी उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, श्री गोरक्षनाथ प्रकट दिन, भारतीय सौर कार्तिक १५ शके १९४४.

१९९९ ः विकसनशील देशांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताचे ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर.

२००२ ः मूळच्या नागपूरच्या असलेल्या स्वाती दांडेकर या अमेरिकेतील आयोवा राज्याच्या प्रतिनिधिगृहात निवडून आल्या. अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधिगृहात सदस्य झालेल्या त्या पहिल्या अमेरिकी-भारतीय महिला ठरल्या.

२००८ ः प्रसिद्ध काश्‍मिरी कवी रहमान राही यांना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते २००४ चा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविले.

२०१५ ः राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांच्या एका गटाने जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून महाकाय आकाराच्या दीर्घिकेचा शोध लावला.