Monthly Horoscope
sakal
Horoscope | राशी भविष्य
कसा असेल तुमचा वर्षअखेरीचा महिना? (१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५)
या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील, स्थैर्य आणि आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल.
- पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे
मेष - आर्थिक स्थिती सुधारेल
या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील व वरिष्ठांचा विश्वास वाढेल. प्रमोशन किंवा नवीन पदाची शक्यता प्रबळ. व्यावसायिकांना परदेशातून किंवा ऑनलाइन प्रकल्पांमधून लाभ. आर्थिक स्थिती सुधारेल, पण अचानक खर्चही वाढतील. कौटुंबिक जीवन सौहार्दपूर्ण, वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायी. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब, ॲसिडिटी याकडे लक्ष द्या. प्रवासातून फायदे होतील.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा.
