Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 08 May 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope
आजचे राशिभविष्य - 08 मे 2022

आजचे राशिभविष्य - 08 मे 2022

मेष : प्रसन्नता लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कर्क : सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तूळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनू : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कुंभ : एखादी चिंता लागून राहील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.