Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 13th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशिभविष्य - 13 नोव्हेंबर 2022

मेष : नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरणार आहे. शासकीय कामात यश मिळेल.

वृषभ : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. विचार करून धाडस करावे.

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मानसन्मान लाभेल.

कर्क : प्रवासाला विलंब लागण्याची व प्रवासामध्ये अडचणी येण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींच्या संदर्भात अडचणी येण्याची शक्यता आहे. खर्च करावा लागेल.

कन्या : आरोग्याच्या बाबतीत संमिश्र स्थिती राहील. आर्थिक लाभ चांगले होतील.

तूळ : शत्रुपीडा नाही. कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष संधी लाभणार आहे.

वृश्‍चिक : संततिसौख्य उत्तम लाभेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने अत्यंत सावकाश चालवावीत.

मकर : नोकरीमध्ये बदलीची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कुंभ : शासकीय कामात यश लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावे.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.