Rashi Bhavishya
Rashi Bhavishyasakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 15 फेब्रुवारी 2024

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
Published on

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. व्यवसायात वाढ होईल.

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.