Weekly Horoscope: (July 5 to 11, 2025)Sakal
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (५ ते ११ जुलै २०२५)
तुम्हाला हवी तशी गती कोणत्याच कामात येत नसल्याने तुम्ही सध्या मनावर संयम ठेवणे गरजेचे आहे. ग्रहांची अनुकूलता लाभल्यावर आशेचा किरण दिसेल.
अनिता केळकर
मेष
नोकरीत ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित बदल होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. दगदग, धावपळ वाढेल. महिलांनी अलिप्त धोरण ठेवून आपल्या छंदात मन रमवावे. कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल, तर कुटुंबासमवेत छोटी सहल काढा.