
Rakshabandhan 2022: रक्षाबंधनापर्यंत ‘या’ 4 राशीवर मंगळ-राहूच्या युतीचे सावट..!
ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहांला ग्रहांचा मुख्य सेनापती मानले जाते.
या चार राशिमध्ये राहू आधीपासूनच विराजमान होता. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मेष राशीमध्ये अंगारक योग निर्माण झाला आहे. ज्योतिष शास्त्रानूसार या योगाला अशुभ योग मानला जातो.
मेष राशीमध्ये अंगारक योग 10 ऑगस्टपर्यंत असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सुद्धा असणार आहे. त्यामुळे ज्योतिषांच्या मते अंगारक योगामुळे रक्षाबंधनपर्यंत या 4 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे गरजेचं आहे.
आता बघू या कोणत्या आहेत त्या 4 राशी ?
1) मेष:
मंगळ आणि राहूच्या युतीमुळे मेष राशीमध्ये अंगारक योग निर्माण झाला आहे. त्यामुळे या राशीच्या सर्व व्यक्तींनी सांभाळून राहायला हवे. तसेच आपल्या रागावर क्रोधावर आपले नियंत्रण ठेवायला हवे. तसेच चारचाकी, दुचाकी सगळीच वाहने सांभाळून हळू चालवायला हवे.
2) वृषभ:
10 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तीसोबत एखादी दुर्घटना होण्याची शक्यता सांगितली जात आहे. तसेच या राशीतील लोकांना पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा: Rakshabandhan 2022 : यंदा रक्षाबंधन नेमकं कधी आहे? 11 की 12 तारखेला?
3) कर्क:
रक्षाबंधनपर्यंत कर्क राशीच्या व्यक्तींनी चांगलच सतर्क राहायला हवं. कारण या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात कलह, वाद देखील निर्माण होऊ शकतात.म्हणून या राशीतील लोकांनी संयमाने राहणे गरजेचे आहे.
4) तूळ:
अंगारक योगामुळे तूळ राशींच्या व्यक्तींनी सर्तक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या राशीतील सगळयांच लोकांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवूनच बोलावे.नाही तर वादविवाद होऊ शकतात.
या अंगारक योगापासून वाचण्यासाठी वरील चारही राशीच्या लोकांना येणाऱ्या पुढच्या मंगळवारी भगवान हनुमानांची पूजा करावी.आणि जवळच्या हनुमान मंदिरात नित्यनेमाने दिवा लावावा.
Web Title: Until Rakshabandhan Mangal Rahus Presence On These 4 Rashi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..