

Utpanna Ekadashi 2025:
Sakal
Utpanna Ekadashi mistakes: हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला उत्पन्ना एकादशी म्हणतात. यंदा उत्पन्ना एकादशीचे व्रत 15 नोव्हेंबर रोजी पाळले जाईल. भगवान विष्णूची पूजा आणि या दिवशी उपवास केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. असं म्हटलं जातं की सर्व पापांचा नाश करणारी मानली जाणारी माता एकादशीचा जन्म याच दिवशी झाला होता. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की जर या पवित्र एकादशीला चुका झाल्या तर व्रताचे फायदे अपूर्ण राहतात. म्हणून, या दिवशी कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.