संघर्षाचा काळ असला तरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वाटचाल करा, म्हणजे संघर्षाची धार कमी होऊन तुमचा मनस्ताप कमी होण्यास मदत होईल.
-निखिल शेंडूरकर
Virgo Horoscope Kanya Rashi 2025 : मुळातच कन्या राशीचे लोक भावूक होऊन प्रत्येक गोष्टीवर अगदी बारीक-सारीक विचार करणारे असतात. त्यामुळे छोट्या-छोट्या बाबींनी ते अपसेट होताना दिसतात. मात्र, हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे जीव लावून पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. संघर्षाचा काळ असला तरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वाटचाल करा, म्हणजे संघर्षाची धार कमी होऊन तुमचा मनस्ताप कमी होण्यास मदत होईल. नोकरीमध्ये सजग राहा, व्यवसायात चौफेर काय सुरू आहे हे पाहा. महिलांसाठी (Women) माणसे जपणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय इतर विचार करू नयेत.