weekly horoscope 14th december 2025 to 20th december 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (१४ डिसेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५)
जीवनसूत्राचा सांभाळ करत म्हणा किंवा जीवनसूत्राचा शोध घेत म्हणा, माणूस अनेक मन्वंतरांतून जन्म-मरणाचा प्रवासच करत असतो.
वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ होतील
मेष : अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मातृपितृचिंता ग्रासू शकते. सप्ताहात ता. १७ व १८ हे दिवस वैयक्तिक व्याधींच्या पार्श्वभूमीवर पथ्ये पाळण्याचेच. काहींना ज्वरपीडा शक्य. सप्ताहातील अमावस्येजवळचे ग्रहमान संमिश्र फलदायी होईल. घरात भावाबहिणींशी भांडणे टाळा. बाकी सप्ताहात उद्याच्या एकादशीचा दैवी प्रभाव जाणवेलच. पुत्रचिंता जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक घबाडयोग आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ होतील. मात्र सप्ताहात राजकीय व्यक्तींशी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. अमावस्येजवळ वाहने सांभाळा. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या.

