weekly horoscope 16th november 2025 to 22nd november 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (१६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५)
विश्व हे जणू पंचमहाभूतांच्या भांडवलावर आभासात असते किंवा जगत असते.
नोकरीत हितशत्रूंना जरब बसेल
मेष : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी अतिशय प्रभावी राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा चांगलाच लाभ उठवतील. सप्ताहाचा आरंभ एक उत्तम ट्रॅक पकडेल. ता. १७ ते १९ हे दिवस उत्तम रंगसंगतीचेच राहतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घडवाच. सरकारी कामे फत्ते होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील चिंता जाईल. पती वा पत्नीची आरोग्य चिंता जाईल. ता. २० चा गुरुवार एकूणच आपल्या राशीस ग्रहदेवता साथ देतील. सप्ताहात नोकरीतील हितशत्रूंना जरब बसेल. सप्ताहात नोकरीत वरिष्ठांशी उत्तम संधान राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार स्वप्नदृष्टान्त देईल.

