weekly horoscope 18th february 2024 to 24th february 2024 pjp78
weekly horoscope 18th february 2024 to 24th february 2024 pjp78Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१८ फेब्रुवारी २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२४)

मन, शरीर आणि प्राण यांच्या संयोगातून अंतर्बाह्य आनंद उपभोगणारा माणूस नावाचा प्राणी आपलं तारुण्यही उपभोगत असतो.

नोकरीत उत्तम पर्व सुरू होईल

मेष : सप्ताहातील मंगळ-शुक्र सहयोग चंद्रबळाच्या साथीतून उत्तम फळं देईल. नव्या ओळखींतून लाभ. ता. २१ व २२ हे दिवस तरुणांना झकासच फळं देतील. नोकरीतील एक उत्तम पर्व सुरू होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन मिळेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची विवाहाकडं वाटचाल. प्रेमविवाहातील अडसर जातील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार गाठीभेटींतून वादग्रस्त. बाकी पौर्णिमा चैनीची.

तरुणांचा भाग्योदय होईल

वृषभ : ग्रहांचा ट्रॅक सुसंगतच राहील. चंद्रबळातून होतकरू तरुणांचे भाग्योदय होतील. कॅम्पसमधून उत्तम नोकरी मिळेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस नोकरी देणारे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र सहयोग वैवाहिक जीवनातून सुवार्तांचा. येणारी पौर्णिमा मोठ्या भाग्योदयाची नोंद करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन मिळेल. काहींना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल.

सरकारी कामं होतील

मिथुन : सप्ताहातील ग्रहमान जुगारसदृश व्यवहारांतून सांभाळण्याचं. सप्ताहाच्या शेवटी पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र असेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक धनलाभातून लाभ. विशिष्ट सरकारी कामे फत्ते होतील. ता. २० ते २२ हे दिवस सुवार्तांच्या पार्श्वभूमीचेच असतील. पती वा पत्नीला उत्तम नोकरीचा लाभ होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती मिळेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय.

व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील

कर्क : मंगळ-शुक्र युतियोगाचं पॅकेज राहील. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. सप्ताहात वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ गुरुपुष्यामृतावर लॉटरी लागेल. घरात मोठा समारंभ साजरा कराल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात गर्भवतींनी सांभाळावं. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात वृद्धांची काळजी घ्यावी. रोख पैसे सांभाळा.

पर्यटनातून आनंद मिळेल

सिंह : सप्ताहातील वाढत्या चंद्रबळाचा मघा नक्षत्राच्या व्यक्तींना छान लाभ होऊ शकतो. मित्रमंडळींकडून लाभ होतील. सप्ताहारंभ थोरामोठ्यांच्या सहकार्यातून चमत्कार घडवेल. काहींना उत्तम नोकरीचा लाभ. काहींना वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून मोठे लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र पर्यटनातून आनंद देणारे. चैनीवर खर्च. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणातून लाभ.

व्यसनी मित्रांना टाळा

कन्या : सप्ताहातील वाढत्या चंद्रबळाचा मंगळ-शुक्राच्या सहयोगाच्या पार्श्वभूमीवर उत्तम लाभ उठवाल. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. आजचा रविवार मोठ्या गाठीभेटींचा. घरात कार्य ठरतील. उंची खरेदी होईल. हस्त नक्षत्राचा शेअर सप्ताहात वधारेल. उत्तरा नक्षत्र गाठीभेटींतून प्रेमात पडेल. कनेक्टिव्हिटी वाढवाच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील एक छान पर्व सुरू होईल. मात्र व्यसनी मित्रांपासून दूर राहा.

उत्तम नोकरी लाभेल

तूळ : मंगळ-शुक्र सहयोगाचं पॅकेज आपल्या राशीवर पूर्ण अंमल करेल. विवाहविषयक गाठीभेटी कराच. ता. २२ ते २४ हे दिवस चंद्रबळातून अद्वितीय स्पंदनांचे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना घरी आणि दारी चांगली कनेक्टिव्हिटी लाभेल, म्हणाल ते होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी वाव मिळेल. व्हिसा मिळेल.

व्यावसायिक वसुली होईल

वृश्चिक : आजचा रविवार महत्त्वाच्या गाठीभेटींतून साध्य होणारा. एखादी व्यावसायिक वसुली होईल. प्रेमिकांचे दुरावे नाहीसे होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र यांच्या सहयोगातून मनाच्या तारुण्याचा खरा लाभ घडेल. ता. २२ चा गुरुपुष्यामृत योग मोठी अजब फळं देईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. विशाखा नक्षत्रास देवदर्शनातून प्रचिती. नवपरिणितांना गर्भसंभव.

वास्तुविषयक व्यवहारात फायदा

धनु : सप्ताहातील मंगळ-शुक्र सहयोग स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहात मोठा धनलाभ देऊन जाईल. वास्तुविषयक व्यवहारांतून लॉटरी लागेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना खेळ वा छंदातून अतिशय छान प्रतिसाद देईल. काहींना ओळखींतून नोकरीचा लाभ. परदेशात शैक्षणिक भाग्योदय होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पती वा पत्नीचा भाग्योदय धन्यता देईल. उत्तराषाढा नक्षत्रास पौर्णिमा मोठ्या नैतिक विजयाची.

चंद्रबळाचा लाभ मिळेल

मकर : उत्तम साथसंगतीचा सप्ताह. वाढत्या चंद्रबळाचा अफलातून लाभ उठवाल. जॉब मार्केट, मॅरेज मार्केट आणि शेअर मार्केट या तिन्हीमध्ये लाभ घेणार आहात. मंगळ-शुक्र यांच्या सहयोगाचा उत्तम लाभ उठवाल. ता. २१ ते २३ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम काळ आणतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तीचा वैवाहिक जीवनातून आनंदोत्सव साजरा होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा आजचा रविवार भाग्योदयाचा.

अडलेली कामं मार्गी लागतील

कुंभ : आजचा रविवार सप्ताहाचं पॅकेजच घोषित करेल. अर्थातच चंद्रबळाचा हा सप्ताह व्यावसायिक नव्या प्रस्तावांना वाव देईल, अडलेली कामं मार्गी लावेल. ता. २० ची जया एकादशी विशिष्ट विजयोत्सव साजरा करेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र सहयोग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्राचा विलक्षण लाभ देईल. तरुणांचं नोकरीतील एखादं शल्य जाईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास राजकीय दिलासा किंवा साह्य मिळेल.

सुवर्ण क्षणांची नोंद होईल

मीन : सप्ताहात नक्षत्रलोकांतून लाभ घेणारी रास राहील. सप्ताहातील गुरुपुष्यामृतयोग याचीच पावती देईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती ऋणमुक्त होतील. ता. २० ते २२ हे दिवस जीवनातील सुवर्णक्षण नोंदवतील. होतकरू तरुणांचा भाग्योदय होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विशिष्ट निर्णायक गाठीभेटींचा. व्यावसायिक पेचप्रसंग जाईल. पौर्णिमेजवळ कुपथ्यं टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com