Weekly Horoscope 18th june 2023 to 24th june 2023
Weekly Horoscope 18th june 2023 to 24th june 2023Sakal

साप्ताहिक राशिभविष्य (१८ जून २०२३ ते २४ जून २०२३)

कालजयाचं सूत्र हातात घेऊन भगवंत आकाश होत या आकाशात विश्‍वाला खेळायला एक अवकाश (space) देत असतात. पृथ्वी आपल्या भोवती प्रदक्षिणा घालत सूर्याभोवती फिरत असते.

मोठे चमत्कार घडतील

मेष : सप्ताहात अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिचातुर्यातून लाभ होतील. ता. २१ व २२ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. वास्तुविषयक व्यवहारातून मोकळे व्हाल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ चा गुरुवार सरकारी कामातून यश देणारा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार वाहनभयाचा.

व्यावसायिक प्राप्ती, वसुली होईल

वृषभ : सप्ताह व्यावसायिक प्राप्तीतून प्रसन्न ठेवेलच. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहाची सुरुवात थोरामोठ्यांच्या ओळखी-मध्यस्थीतून लाभ देणारी. मृग नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ उठवतील. वैवाहिक जीवनातून आनंद साजरा कराल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रविवाहातून धन्यता. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ.

नोकरीच्या मुलाखतीत यश

मिथुन : सप्ताह निश्‍चितच सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. विवाहेच्छूंनी आपले प्रेमाचे अँटिने रोखून धराच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी लाभ, मुलाबाळांना उत्तम नोकरीचा लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस नोकरीच्या मुलाखतीमध्ये यशस्वी करतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा आजचा रविवार वस्तू हरवण्याचा; प्रवासात पाकीट सांभाळा.

न्यायालयीन प्रकरणातून सुटका

कर्क : सप्ताहात आपली पतप्रतिष्ठा वाढून आपला शेअर चांगलाच वधारेल. ता. २० ते २२ हे दिवस पुष्य नक्षत्रास विजयी चौकार-षटकार मारू देतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं विशिष्ट वादग्रस्त कोर्ट प्रकरण सुटेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात आदर-सत्कारातून लाभ, अचानक धनलाभ.

पर्यटनाचा योग

सिंह : सप्ताह नोकरीत प्रसन्नता ठेवेल. नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा शेवट मोठा आनंद साजरा करणारा. घरातील तरुणांची शुभकार्यं ठरतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात छान पर्यटनाचे योग. शनिवार शैक्षणिक चिंता घालवणारा. मात्र, सार्वजनिक जीवनात सांभाळा, राजकारणी व्यक्तींचा संपर्क नकोच.

वादग्रस्त येणी वसूल होतील

कन्या : सप्ताहाची सुरुवात शुभग्रहांच्या अंडरकरंटचीच, महत्त्वाच्या कामांना वेग येईल. सप्ताह बेरोजगारांना संधी देणारा. ता. २१ व २२ हे दिवस हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना आत्यंतिक प्रवाही राहतील. व्यावसायिक वादग्रस्त वा प्रलंबित येणी येतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परिचयोत्तर विवाहाचे योग. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी खर्चाचे प्रसंग.

नोकरीत योग्य ठिकाणी बदली

तूळ : सप्ताह आरंभीपासूनच सुसंगत राहील. नव्या ओळखी होतील. ता. २० ते २२ हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम रसद पुरवणारे. ऐनवेळी मोठे लाभ. व्यावसायिक मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची कोर्ट प्रकरणं मार्गी लागतील. नोकरीत योग्यस्थळी बदली. शनिवारी सार्वजनिक जीवनात सांभाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची भातृचिंता जाईल.

मनासारखी वाटचाल

वृश्‍चिक : भाग्यातील मंगळ-शुक्राची जोडगोळी मोठी मजेदार फळं देईल. मित्रमंडळींकडून लाभ. ज्येष्ठा नक्षत्रास एकूणच सप्ताह मनासारखी वाटचाल करेल. मात्र, सप्ताहाच्या शेवटी जुगार टाळा. अनुराधा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट नोकरीत ताणतणावांचा. मात्र, शुक्रवार पती व पत्नीच्या भाग्योदयाचा.

कलाकारांना प्रतिष्ठा लाभेल

धनू : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना भाग्योदयाचाच राहील. कलाकारांना पतप्रतिष्ठेचा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ पती वा पत्नीच्या विशिष्ट चिंतेचा. बाकी सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस वैयक्तिक सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ जूनचा गुरुवार व्यावसायिक कोर्ट प्रकरणातून लाभ देणारा, पुत्रचिंता जाईल.

हुकमी यश देणारा काळ

मकर : ग्रहांचं फिल्ड धावसंख्या देणारंच. ता. २० ते २२ हे दिवस मोठे हुकमी यश देणारे. जीवनातील प्युअर सीक्वेन्स लागतील. विवाहेच्छूंनो प्रेमसंदेश स्वीकारण्यासाठी तयार रहाच. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संसर्गजन्य बाधेचा त्रास होऊ शकतो. आजचा रविवार सांभाळाच.

आचारसंहितेचं पालन करा

कुंभ : वक्री शनीची राजवट सुरू झाली आहे. सर्व बाबतीत आचारसंहिता पाळाच. बाकी काहींना गुरुभ्रमणाचा अंडरकरंट उत्तम साथ देईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा लाभ घेतील.

ता. २२ ते २४ हे दिवस संमिश्र स्वरूपाची फळं देतील. काहींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ, व्यावसायिक उत्तम वसुली. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना भाऊबंदकीतून त्रास होऊ शकतो. बाकी नोकरीतील चिंता जाईल.

गॉडफादर मिळेल

मीन : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहीलच. ता. २० ते २२ हे दिवस सतत हुकमी यश देतील. सप्ताह तरुणांना निश्‍चितच प्रेरक राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवीप्रचिती.

उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे नवे व्यावसायिक पर्याय चांगलेच फलद्रूप होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल. शनिवार विचित्र खर्चाचा, वाहनपीडा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com