weekly horoscope 19th may 2024 to 25th may 2024
weekly horoscope 19th may 2024 to 25th may 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१९ मे २०२४ ते २५ मे २०२४)

पौर्णिमा आणि अमावस्या या ध्यानात घेऊन ज्ञान संपादन करणारेच ज्योतिष होऊ शकतात. असं हे ज्ञानकला विकसित करून त्या ज्ञानकलांचं अनुसंधान ठेवणारं ज्योतिषशास्त्र ही एक आध्यात्मिक साधनाच म्हणावी लागेल.

चांगली नोकरी मिळेल

मेष : शुक्राच्या राश्‍यांतरातून होणारा गुरु-शुक्र सहयोग व्यावसायिकांना विशिष्ट आर्थिक कोंडीतून निश्‍चितच सोडवेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ होईल. पौर्णिमेजवळ घरात मोठ्या सुवार्ता येतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल. वादग्रस्त येणे येईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार भेटवस्तू मिळण्याचा ठरेल.

ओळखी-मध्यस्थीतून लाभ

वृषभ : सप्ताहाचं बजेट शुभग्रहांच्याच ताब्यात राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. जीवनातील शत्रुत्व शमेल. ता. २३ ची पौर्णिमा संस्मरणीय राहील. वैयक्तिक आयुष्यात हृद्य समारंभ होतील. ओळखी-मध्यस्थीतून मोठे लाभ शक्य. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारी. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार धन लाभाचा ठरेल.

तरुणवर्गाचे प्रश्‍न सुटतील

मिथुन : मंगळ-राहू सहयोग पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर झळा पोहोचवू शकतो. राजकारणी व्यक्तीपासून जपून राहा. बाकी सप्ताह घरातील तरुणवर्गाचे प्रश्‍न सोडवेल. पौर्णिमेजवळ आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून मोठे लाभ शक्य. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मौजमजेची. प्रेमिकांच्या गाठीभेटी होतील.

किचकट प्रश्‍न संपतील

कर्क : पौर्णिमेचा सप्ताह शुभग्रहांच्या ग्रहयोगांतून मोठ्या कनेक्टिव्हिटीचा. तरुणांनी नकारात्मक विचार टाळावेत. नोकरीच्या मुलाखती अवश्‍य देणे. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्रं मोठं शुभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून मोठे आर्थिक लाभ होतील. किचकट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. वास्तुविषयक प्रश्‍न सुटतील आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकन मिळेल.

व्यवसायामध्ये धनवर्षाव

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येतील. मोठ्या स्पर्धा परीक्षांतून यश मिळेल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. ता. २३ व २४ हे दिवस अर्थातच पौर्णिमेजवळ चांदणे शिंपीत नेणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे व्यावसायिक पर्याय वा लागेबांधे फलद्रूप होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात मोठ्या व्यावसायिक धन वर्षावाची. सरकारी कामं होतील.

चौकार-षटकार माराल

कन्या : पौर्णिमेच्या सप्ताहात शुभग्रहांचं मोठं आधिष्ठान राहील. तरुणांनी यशाचे चौकार-षटकार मारण्यासाठी अगदी सज्ज राहावं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात सतत फ्लॅशन्यूजमध्ये राहतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतील विशिष्ट चिंता जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक लॉटरीचा. सोमवारी पती वा पत्नींचा भाग्योदय होईल.

चोरी नुकसानीपासून सांभाळा

तूळ : पौर्णिमेला मंगळ-राहू सहयोगाचा विचित्र प्रभाव राहू शकतो. आरोग्यविषयक पथ्यं पाळाच. पौर्णिमेचं फिल्ड व्यावसायिक आर्थिक कोंडी घालवणारे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची थकलेली वसुली होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ वैवाहिक सुवार्तांचं. नोकरीतील गुप्त चिंता जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारातून लाभ होईल.

व्यवसायात तेजीचा कालखंड

वृश्‍चिक : सप्ताहात गुरु-शुक्रांच्या सहयोगातून पौर्णिमा चांदणे शिंपीत नेणारी. सप्ताह वैवाहिक जीवन फुलवणारा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजी प्रसन्न ठेवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २३ व २४ हे दिवस ऐतिहासिक असेच राहतील. बलवत्तर विवाहयोग आहेत. नोकरी-व्यावसायात एक सुंदर पर्व सुरू होत आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विशिष्ट संसर्गाची, मात्र नोकरीतील संकट घालवणारी.

परदेशगमनाची जोरदार शक्यता

धनु : सप्ताहामध्ये मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेजवळ नोकरीतील एक सुंदर पर्व सुरू होईल. विद्यार्थ्यांना विशिष्ट निर्णायक यश मिळेल. मुलाखतीतून परदेशगमन निश्‍चित होईल. ता. २२ व २३ हे दिवस एकूणच आपल्या राशीस शुभग्रहांचं उत्तम पाठबळ देणारे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार न्यायालयीन प्रकरणात यश देणार. पुत्रविषयक चिंता जाईल.

‘गॉडफादर’ लाभेल

मकर : पौर्णिमेजवळ गुरु-शुक्र सहयोग राहील. मोठ्या अद्वितीय घटना घडतील. उमलत्या तरुणाईला मोठं सुंदर ग्रहमान सुरू होत आहे. साडेसातीचा बाऊ करू नका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. म्हणाल ते होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत स्थिरावतील. नवविवाहितांना हा सप्ताह एक पर्वणीसारखाच राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या चैनीचा.

नोकरीत बढतीची चाहूल

कुंभ : पौर्णिमा चांदणे शिंपीत नेणारी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना साडेसाती विसरण्याचा काळ. घरात मोठे प्रसन्न वातावरण राहील. सप्ताह होतकरू तरुणवर्गास निश्‍चितच मार्ग दाखवून देईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ. नोकरीत बढतीची चाहूल लागेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील पौर्णिमा संमिश्र फळे देणारी. सार्वजनिक वाद नकोत.

नोकरीत अनुकूलता लाभेल

मीन : गुरु-शुक्र सहयोग मोठ्या पर्वणीसारखा बोलेल. विशिष्ट महत्त्वाची कामं होऊन व्यावसायिक ऊर्जा प्राप्त होईल. सप्ताह घरातील प्रिय व्यक्तींच्या संदर्भातून विलक्षण भाग्योदयाचा राहील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सन्मान प्राप्त होईल. नोकरीतील विशिष्ट विरोधी वातावरण जाईल. वरिष्ठांचा कृपाप्रसाद मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विवाहविषयक गाठीभेटीचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com