

weekly horoscope 21st december 2025 to 27th december 2025
सरकारी माध्यमातून लाभ होतील
मेष : सप्ताहात गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर आणि शुक्रभ्रमणाच्या वाटचालीतून तरुणांना उत्साहवर्धक घडामोडी घडतीलच. नोकरी-व्यावसायिक अडचणी निस्तरल्या जातील. सप्ताहात लांबलेली आर्थिक येणी येतील. सरकारी माध्यमांतून लाभ होतील. सप्ताहाची सुरुवात अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट व्यावसायिक ग्रहण घालवेल. वैवाहिक जीवनातील सुवार्ता प्रसन्न ठेवतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठे भाग्य घेऊन येणाराच राहील. पुत्रोत्कर्ष धन्य करेल. विशिष्ट नवस फेडाल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट स्पर्धात्मक यशाचा.