

weekly horoscope 21st september 2025 to 27th september 2025
वेंधळेपणातून होणारे नुकसान टाळा
मेष : सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्याधिजन्य ठरू शकतो. आहारविहारादी पथ्ये पाळाच. आजची अमावस्या वेंधळेपणातून नुकसानीची ठरण्याची शक्यता. भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस मोठे प्रसन्न वातावरणाचे राहतील. प्रियजनांचा मोठा सहवास लाभेल तसेच काहींचे विशिष्ट शुभारंभ, काहींची उंची खरेदी. विशिष्ट भेट वस्तूतून चकित व्हाल. शनिवार अकल्पित भेटीतून लाभाचा ठरेल.