Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

साप्ताहिक राशिभविष्य (२२ मे २०२२ ते २८ मे २०२२)

मनुष्यलोक हा सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची एक सरसकट विचित्र भेसळ होऊन आविष्कृत होत असतो. अर्थातच, रजोगुणाची नाळ पकडून जन्माला आलेला हा मनुष्यप्राणी जन्म-मृत्यूच्या क्षणांचाही सोयर-सुतकाच्या माध्यमातून विटाळ पाळत असतो!

तरुणांना चांगला काळ

मेष : राशीतील शुक्राचं एक छान पर्व उद्यापासून सुरू होत आहे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ उठवतील. ता. २५ ते २७ हे दिवस तरुणांचं शिक्षण, नोकरी किंवा विवाह या माध्यमातून प्युअर सीक्वेन्स लावतील. काहींचं परदेशगमन होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विचित्र वादविवादाचा.

स्वतंत्र व्यावसायिकांना उभारी

वृषभ : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठी उभारी देईल. आर्थिक कोंडी फुटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ - गुरू सहयोगातून ओळखी - मध्यस्थींतून लाभ. ता. २४ ते २६ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ मे चा बुधवार सुवार्तेतून मौजमजेचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी खरेदीत जपावं.

वादग्रस्त येणी येतील

मिथुन : सप्ताहात लाभातील शुक्रभ्रमणाचे व्यावसायिकांना मोठे लाभ होतील. वादग्रस्त येणी येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय फॉर्मात येतील. ता. २५ व २६ हे दिवस एकूणच जल्लोषाचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं उत्तम कलाप्रदर्शन साजरं होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट कुसंगतीतून जपावा.

नोकरीतील कटकटी संपतील

कर्क : सप्ताह एकूणच मोठा दिलासा देणारा. ग्रहांचं हाय व्होल्टेज कमी होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरीतील कटकटी संपतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहात जीवनातील मोठ्या संधी प्राप्त होतील. ता. २५ व २६ हे दिवस जीवनातील जान वाढवतील. आश्‍लेषा व्यक्तींना शनिवार विचित्र गाठीभेटींचा.

सरकारी कामं मार्गी लागतील

सिंह : सप्ताह उत्तम व्यावसायिक उलाढालींचा. सरकारी कामं मार्गी लागतील. सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. सप्ताहाचा शेवट धक्कादायक सुवार्तांचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशातून संधी प्राप्त होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मातृपितृचिंतेचा. काहींना लोकापवादातून त्रास.

अनपेक्षित बढतीची संधी

कन्या : सप्ताहात ग्रहांचं फिल्ड नाकासमोर चालण्याचं. वादग्रस्त मुद्दे सांभाळा. बाकी सप्ताह तरुणांना उत्तम संधी देणारा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून महत्त्वाचा कालखंड. काहींना नोकरीत अनपेक्षित बढतीची संधी. आजचा रविवार व ता. २५ व २६ मे हे दिवस चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना घरात प्रिय व्यक्तींच्या सुवार्तांचा.

दागदागिन्यांची काळजी घ्या

तूळ : सप्ताहातील शुक्राचं राश्‍यंतर अतिशय शुभशकुनी ठरणार आहे. तरुणांना विशिष्ट कला, छंद माध्यमातून प्रकाशात आणणारा सप्ताह. सप्ताहात चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. विवाह ठरवाल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी उत्सव-समारंभात दागदागिने सांभाळावेत.

मोठे करार-मदार होतील

वृश्‍चिक : सप्ताहात गुरुबळाचा पूर्ण लाभ उठवाल. ता. २५ व २६ हे दिवस जल्लोषाचेच राहतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठा शुभलक्षणी, मोठे करार-मदार. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. ता. २५ चा गुरुवार विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी करणारा. भाजणं-कापणं यापासून जपा.

मान-सन्मान वाढण्याचा कालखंड

धनू : मंगळ-गुरू सहयोगाचं एक सुंदर पर्व सप्ताहात राहील. सप्ताहात होणारं शुक्राचं राश्‍यंतर मूळ नक्षत्रास सुगंधित मानसिक पर्यावरण ठेवण्यास मदत करणार आहे. शिवाय गुरूचं अधिष्ठान घरी व दारी आपला मान वाढवणारंच ठरणार आहे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २७ हे दिवस पूर्णपणे शुभ ग्रहांच्या पॅकेजचे.

दैवी चमत्काराचा अनुभव

मकर : सप्ताहात शुक्राचं चतुर्थातील आगमन सुंदर क्‍लिक होणारं. ता. २५ ते २७ हे दिवस उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना हुकमी कामं करून देतील. घरात तरुणांची कार्यं ठरवाल. आजचा रविवार धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी चमत्कारातून थक्क करेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार नोकरीत शुभलक्षणी.

स्पर्धेमध्ये यश लाभेल

कुंभ : सप्ताहात शुभ ग्रहांची लॉबी उत्तम क्रियाशील राहील. तरुणांनी अवश्‍य लाभ घ्यावा. ता. २५ ते २६ मे हे दिवस धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पत्रव्यवहार, गाठीभेटी व विशिष्ट करार-मदार इत्यादींतून अतिशय सुसंगत राहतील. नोकरीत मानांकन मिळेल.

नोकरीत सुंदर पर्व सुरू होईल

मीन : सप्ताहात आपल्या राशीस परिस्थितिजन्य लाभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील एक सुंदर पर्व सुरू होईल. शुक्रभ्रमणाची स्पंदनं पूर्णपणे खेचून घेणार आहात. आजचा रविवार याचीच ग्वाही देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री बुधाची स्थिती जनसंपर्कातून मोठी फलदायी होईल. नोकरीच्या मुलाखतींतून यश. पती वा पत्नीचा भाग्योदय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com