weekly horoscope 24th august 2025 to 30th august 2025Sakal
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (२४ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५)
मन ज्या वेळी आपल्याशीच संवाद करते, त्या वेळी ते विशिष्ट संकल्पाच्या तावडीत सापडते.
व्यावसायिक समृद्धीचा कालखंड
मेष : सप्ताह श्रीगणेशांच्या कृपेचाच राहील. ता. २७ ते २९ हे दिवस घरात मोठे प्रसन्न राहतील. पुत्रपौत्रांच्या भाग्योदयातून श्रीगणेशोत्सव भावरम्य राहील. घरात लग्नकार्ये ठरतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक समृद्धीचाच राहील. नवे व्यावसायिक उपक्रम मार्गस्थ होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विशिष्ट प्रसिद्धियोगातून थक्क करेल. तरुणांना सप्ताह शैक्षणिक आत्मविश्वास वाढवेल. काहींचा परदेशी भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा चैनीवर खर्च होईल.