Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 25th September 2022 to 1st October 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२२)

व्यावसायिकांना मोठा हुरूप येईल

मेष : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा हुरूप देईल. नवरात्रारंभात शुभग्रहांचीच व्यूहरचना राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात भाग्यबीजं पेरली जातील. वैवाहिक जीवनात नवरात्र मांगल्य आणेल. पती वा पत्नीचा उत्कर्ष. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांचा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वाहनं सांभाळावी.

व्यावसायिकांना पत मिळेल

वृषभ : ग्रहांचं फिल्ड पूर्णपणे फलंदाजीचं. आजची अमावास्या शुभशकुनीच. रवी-गुरू शुभयोग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना राज्याभिषेक होईल. व्यावसायिकांना पत-प्रतिष्ठा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. उद्याची घटस्थापना दैवी प्रचितीची. ता. ३० व १ हे दिवस एकूणच आपल्या राशीचा शेअर वधारेल अशी परिस्थिती असेल.

धनलाभ व परदेशगमनाचा योग

मिथुन : सप्ताहात शुभग्रहांचं उत्तम संधान राहील. उद्याची घटस्थापना जीवनाचं सार्थक करणारी. सत्संग घडेल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती अतिशय फॉर्मात येतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विलक्षणच. ता. ३० ची ललिता पंचमी एक उत्तम शुभमुहूर्त. आर्दा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा धनलाभ होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.

शत्रूंवर विजय मिळवाल

कर्क : जनसंपर्कातून प्रभावी राहणारा सप्ताह. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापनेचा दिवस सुवार्तांतून आनंदी करेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभग्रहांच्या अधिष्ठानातून चौकार-षटकारांचा. तरुणांना सप्ताहाचा शेवट मुलाखतींतून महत्त्वाचा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचा शत्रूंवर विजय.

स्त्रीवर्गाबरोबर गैरसमज टाळा

सिंह : घटस्थापनेजवळ मोठे व्यावसायिक लाभ. बुध-शुक्र सहयोग सप्ताहावर पूर्ण अंमल करेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची जोरदार बॅटिंग होईल. मात्र, स्त्रीवर्गाबरोबर गैरसमज टाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापना सांपत्तिक उत्कर्षाची. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची सुसंधी. ता. २६ व २७ हे दिवस मोठ्या सुवार्तांचे.

राज्याभिषेकाचा योग

कन्या : ग्रहयोगांतून ग्रहांचा पट आपणास पूर्ण अनुकूल राहील. तरुणांनो आपले प्रेमाचे अँटिने सज्ज ठेवा. उद्याची घटस्थापना काहींचा राज्याभिषेकच करेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभघटनांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी अनुग्रह. मंत्री प्रसन्न होतील.

विशिष्ट गाठीभेटी लाभदायी

तूळ : सप्ताहात शुभग्रहांची स्पंदनं राहतीलच. अर्थातच ती आपलं सॉफ्टवेअर स्वच्छ करून खेचून घ्यावी लागतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची घटस्थापना विशिष्ट गाठीभेटींतून लाभदायी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची अमावास्या दैवी प्रचितीची. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात जपा. दुष्टोत्तरं टाळा.

तरुणांना नोकरीचा योग

वृश्‍चिक : राशिचक्रातील सप्ताहातील अग्रमानांकित रास राहील. नवरात्रारंभ अतिशय भावरम्य राहील. सप्ताहात शुभग्रह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपणास उत्तम साथ देतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणसंपन्न होतील. तरुणांना परदेशी नोकरी. सप्ताहाचा शेवट अतिशय गोड राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापना नोकरीत शुभ.

प्रकाशझोतात याल

धनू : बुध-शुक्र सहयोग आणि रवी-गुरू शुभयोगाचा उजाला आपणास चांगलाच प्रकाशात आणेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापनेचा हा सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर छानच. ललिता पंचमी घरातील सुवार्तांची. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीचिंता. बाकी शेवटी मोठे धनलाभ.

साडेसाती विसरणारा कालखंड

मकर : शुभग्रहांच्या साथसंगतीतून साडेसाती विसराल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरी-व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर एक सुंदर पर्व सुरू करेल. श्रवण नक्षत्रास घटस्थापनेजवळ मुलाखतीतून यश. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची राजनीती यशस्वी होईल.

तरुणांच्या समस्या सुटतील

कुंभ : आजच्या अमावास्येजवळ भावनोद्रेक टाळा. बाकी पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट यश खेचून आणणारा. प्रेमिकांचा मार्ग मोकळा होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची शक्यता. ललिता पंचमी सुवार्तांची.

सरकारी यंत्रणेचं सहकार्य मिळेल

मीन : बुध-शुक्र सहयोग आणि रवी-गुरू प्रतियुतीची पार्श्‍वभूमी नवरात्रारंभ पवित्र भावस्पंदनांतून करेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं नशीब उलगडेल. उद्याचा सोमवार नोकरीत प्रशंसेचा. तरुणांना सप्ताहाचा शेवट ध्येयपूर्तीचा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी साहाय्य. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी सौंदर्यालंकार जपावे.