weekly horoscope 26th october 2025 to 1st november 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५)
पंचमहाभूतांच्या मूलभूत वृत्तीचा आविष्कार म्हणजेच पाच पांडवांचा जन्म होय आणि या पाच पांडवांचा प्रपंच द्रौपदी आपल्या पदराखाली सांभाळत होती.
आरोग्यविषयक पथ्ये पाळावीत
मेष : सप्ताहात जुगारसदृश व्यवहार जपाच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहातील गुरुशी होणारे योग व्यावसायिक क्षेत्रातल्या विशिष्ट कोर्टप्रकरणातून मुक्त करतील. मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. घरात विशिष्ट कार्ये ठरतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक वसुली मिळवून देईल. विशिष्ट कामगार-पीडा संपेल. सप्ताहात विशिष्ट स्वरूपाची भावाबहिणीची चिंता जाईल. त्यांचे भवितव्य उलगडेल. सप्ताहाचा शेवट एकूणच प्रवासात सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या खर्च वा नुकसानीचा. धारदार वस्तू वा उपकरणे जपून हाताळावीत. श्वानदंशापासून सांभाळावे. सप्ताहात शेअरबाजारातील उलाढाली सांभाळाव्यातच. आरोग्यविषयक पथ्ये पाळाच.

