weekly horoscope 28th december 2025 to 3rd january 2026
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६
जन्म मृत्यूसाठी होतो का मृत्यू जन्मासाठी होतो, हे एक न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळेच गीतेत भगवंतांनी ‘कर्मणा गहनो गतिः’ असे म्हटलं आहे.
नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल
मेष : सप्ताहातील रवी-मंगळ युतियोगाची पार्श्वभूमी मंगळवारच्या पुत्रदा एकादशीजवळ खणखणीत शुभफळे देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती प्रकाशझोतात येतील. शिक्षण, नोकरी आणि या त्रिघटकांतून पौर्णिमेपर्यंत उत्तम गतिमान राहणारा सप्ताह. उद्याचा सोमवार अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. शनिवारची पौर्णिमा मोठ्या आदरसत्कारांतून कायमची लक्षात राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार अंतिम टप्प्यात आणेल. विशिष्ट भावाबहिणीची चिंता जाईल.

