Weekly Horoscope 28th September 2025 to 4th October 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (२८ सप्टेंबर २०२५ ते ४ ऑक्टोबर २०२५)
मित्र हो, कलियुगात माणसाच्या अंगात क्षणात भूत संचारत असते आणि हे भूत मनोविकारांच्या माध्यमातून माणसाला रावण बनवत असते.
जीवनाला सूर गवसेल
मेष : विजयादशमीचा सप्ताह कलाकार, खेळाडू मंडळींना मोठी यश-प्रसिद्धी देणारा आहे. नवे उपक्रम यशस्वी होतील. जीवनाला एक सूर गवसेल. मंगळभ्रमण आणि शुक्राची विशिष्ट स्थिती प्रेमिकांना जवळ आणणारी. ता. ३० ते २ हे दिवस एकंदरीतच भाग्यबीजे पेरणारेच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती ग्रहस्थितीचा फायदा घेत विजयी चौकार, षटकार मारतीलच आणि फ्लॅश न्यूज देतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात खूप चैन, चंगळ, मौजमजा करतीलच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी मात्र घरात वृद्धांशी क्रिया-प्रतिक्रिया जपाव्यात. विशेषतः गैरसमज टाळावेत. नवपरिणितांनी जपावे.