weekly horoscope 2nd november 2025 to 8th november 2025

weekly horoscope 2nd november 2025 to 8th november 2025

Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (०२ नोव्हेंबर २०२५ ते ०८ नोव्हेंबर २०२५)

विवाह ही गोष्ट सध्याच्या कलियुगात फारच कटकटीची आणि वेगळ्याच गुंतागुंतीची होत आहे आणि सध्या विवाह ही गोष्ट भावबंधाच्या गाठीशी न राहता विवाद वाढवत गुंतागुंतीचीच होत आहे.
Published on

व्यावसायिकांना मोठ्या व्यवहाराची संधी

मेष : सप्ताहात मंगळ आणि हर्षल यांच्या विशिष्ट योगातून ग्रहांचे फिल्ड फलंदाजीचे नसणार आहे. कोणतीही अरेरावी टाळा. वाहने सांभाळा. वागण्या-बोलण्यातील पथ्ये पाळा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना घरी आणि दारी आचारसंहिता पाळावीच लागेल. बाकी गुरु आणि शुक्र या शुभग्रहांची साथ श्रद्धावंत आणि प्रामाणिक व्यक्तींना राहीलच. अश्विनी आणि भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ व ५ हे दिवस शुभग्रहांची गुप्त रसद मिळून लाभ देतील. पती वा पत्नीच्या विशिष्ट चिंता जातील. नवपरिणितांचे भाग्योदय होतील. गर्भवतींच्या विशिष्ट चिंता जातील. व्यावसायिकांना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार करवून देईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com