weekly horoscope 30th november 2025 to 6th december 2025

weekly horoscope 30th november 2025 to 6th december 2025

Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५)

गीता हे भगवंतांचे अलौकिक दर्शनच होय. अखंड उगवलेल्या व कधीच न मावळणाऱ्या श्रीकृष्णदिवसाचे अर्जुनाला झालेलं हे अलौकिक दर्शन म्हणजेच गीताजयंती होय!
Published on

खरेदी-विक्रीचे व्यवहार अंतिम टप्प्यावर येतील

मेष : सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील ग्रहमान मोठे मजेदार राहील. विशिष्ट उत्सव-समारंभातून मिरवाल. विशिष्ट उंची खरेदी होईल. छान ओळखी होतील. व्यावसायिक भागीदारी यशस्वी होईल. मात्र भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील वृद्धांची काळजी घ्यावी. बाकी सप्ताहाचा शेवट कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा वैवाहिक जीवनातून जल्लोषाचाच राहील. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. विशिष्ट व्यावसायिक उत्सवप्रदर्शने चांगलीच प्रतिसाद देतील. भावाबहिणींचे प्रश्न सुटतील. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार अंतिम टप्पा गाठतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com