weekly horoscope 4th february 2024 to 10th february 2024
weekly horoscope 4th february 2024 to 10th february 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (४ ते १० फेब्रुवारी २०२४)

अध्यात्म शास्त्रात माणसाच्या हृदयस्पंदनाला फार महत्त्व दिलं आहे. माणसाचं हृदयस्पंदन हे ईश्वराशी नाते जोडणारं आहे. ईश्वराचं अनादिसिद्धपण माणसाच्या हृदयातून प्रकट होत असते.

नोकरीत चांगला कालखंड

मेष : सप्ताहातील ता. ६ ची एकादशी गुरुकृपा करणारी. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा भागोदय. नोकरीतील विशिष्ट घडामोडी लाभदायी होतील. एकूणच ता. ६ ते ९ हे दिवस आपल्या राशीस अतिशय सुसंगत आणि प्रवाही राहतील. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रचिंता जाईल. मात्र अमावस्येचं प्रभावक्षेत्र गर्दीच्या ठिकाणी घातक.

थक्क करणारा धनलाभाचा योग

वृषभ : सप्ताहाची सुरुवात होतकरू तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून यश देणारी. ओळखी-मध्यस्थीमधून लाभ. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ८ व ९ हे दिवस अचानक धनलाभातून थक्क करणारे ठरतील. मित्रांकडून लाभ, मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचं प्रभावक्षेत्र वाहनं वा जोखमीच्या कामांतून दक्षता घेण्याची गरज.

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

मिथुन : सप्ताह शुभग्रहांच्याच अखत्यारितला राहील. तरुणांना पूर्ण वाव देणारा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. नोकरीत अधिकार संपन्न व्हाल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात भाजण्या-कापण्यापासून सावध राहावे. अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात उधार उसनवारीपासून सांभाळा. एकूणच अमावस्या आपल्या राशीसाठी दगदगीची, मौल्यवान वस्तू सांभाळा.

प्रवास व गैरसमज टाळा

कर्क : सप्ताहात शिस्तबद्धता पाळाच. धावपळीचा प्रवास टाळाच. खरेदी-विक्री करताना काळजी घ्या. बाकी ता. ८ चा गुरुवार पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्यलक्षणी. घरातील प्रिय व्यक्तींची चिंता जातील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल. एखादं संकट टळेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ च्या अमावस्येचं प्रभावक्षेत्र विचित्र नुकसानीचं ठरू शकतं. घरी वा दारी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

जुनाट व्याधींचा त्रास शक्य

सिंह : सप्ताहाची सुरुवात वादग्रस्त पार्श्वभूमीवर जपाच. वडीलधाऱ्यांशी वाद घालू नका. बाकी ता. ६ ते ९ हे दिवस शुभग्रहांच्या ताब्यातले. पूर्वा नक्षत्रच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडीमध्ये लागलेले एखादे ग्रहण जाईल. सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींना जुनाट व्याधींचा त्रास होऊ शकतो. अमावस्येचं प्रभावक्षेत्र उच्च दाबाचं घात-अपघातापासून सावध राहा.

वादग्रस्त वसुली होईल

कन्या : सप्ताह गर्भवतींनी जपण्याचा, चित्रा नक्षत्राच्या स्त्रीवर्गानं अधिक जपावं. बाकी सप्ताह शुभग्रहाची साथसंगत देईलच. ता. ६ ते ९ हे दिवस मोठी मजेदार फळं देईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात विवाहयोग, नोकरीमध्ये बढतीची चाहूल. व्यावसायिक वादग्रस्त वसुली होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात अमावस्येजवळ संसर्गजन्य ज्वरपीडेपासून जपावे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी गैरसमज होण्याचे प्रसंग टाळावेत.

आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल

तूळ : सप्ताहात एकादशीच्या शुभप्रभावात शुभग्रहांची उत्तम स्पंदनं राहतील. त्याचा लाभ मिळवाच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ ते ९ हे दिवस हृद्य गाठीभेठी घडवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुकृपा होईल. व्यावसायिक आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. राजकीय व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र उपद्रव मूल्य असलेले. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना कामगार पीडा होण्याची शक्यता.

मरगळ जाईल, ऊर्जा लाभेल

वृश्चिक : सप्ताह आई-वडिलांच्या संदर्भातून काळजी घेण्याचा. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक ऊर्जा देणारा. ता. ६ ते ९ हे दिवस स्वतंत्र व्यावसायिकांची मरगळ घालवतील. विशिष्ट व्यावसायिक पर्याय फलद्रूप होतील. मात्र अमावस्येजवळ दुखापती सांभाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गावगुंडाकडून त्रास. श्‍वानदंशापासून जपा.

सुवर्णक्षणांची नोंद होईल

धनू : सप्ताहातील ता. ६ फेबुवारीची एकादशी भाग्य उजळवणारी. होतकरू तरुणांचा भागोदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस मोठे सुवर्णक्षण नोंदवतील. सतत गुरुस्मरणातच राहा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचं प्रभावक्षेत्र विचित्र चोरी-नुकसानीचं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या फसवणुकीची ठरेल.

सर्व बाबतीत आचारसंहिता पाळा

मकर : सप्ताह सर्व बाबतीत आचारसंहिता बाळगण्याचा. तरुणांनी कुसंगत टाळावी. कायदेशीर व्यवहार अतिशय चोख करावेत. बाकी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ फेबुवारीचा शुक्रवार देवदर्शनातून प्रचिती देणारा. पुत्रचिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी लाभेल. धनिष्ठा नक्षत्रास शनिवारला धरून असलेले अमावस्येचे प्रभावक्षेत्र शारीरिक वेदनायुक्त राहील.

अडलेले वास्तुविषयक व्यवहार होतील

कुंभ : सप्ताहात काहींना परिस्थितीजन्य लाभ होतील. एकूणच ता. ७ व ९ या दिवसात शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील चांगल्या संधी येतील. घरातील वादग्रस्तता मिटेल. वास्तुविषयक अडलेले व्यवहार होतील. धनिष्ठा आणि पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचं प्रभावक्षेत्र प्रवासात जपण्याचं. घरातील व्रात्य अशा लहान मुलांना सांभाळा.

परदेशगमनाच्या संधी मिळतील

मीन : सप्ताह गुरुभक्तांना प्रचिती देणाराच. विशिष्ट संकल्पपूर्तीचा आनंद घ्याल. ता. ७ ते ९ हे दिवस रेवती नक्षत्रास व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचे. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत विशिष्ट शुभसंकेत मिळतील. नोकरीतून परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील. अमावस्येजवळ द्वाड मित्रांशी संगत नकोच. व्यसनी माणसांना अमावस्या घातक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com