weekly horoscope 5th october 2025 to 11th october 2025
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)
माणूस चंद्र-सूर्याच्या साक्षीने जगत असतो. पशू-पक्ष्यांना सुद्धा त्यांचा आधारच असतो.
थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभ होतील
मेष : सप्ताहारंभी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्यावसायिक घडामोडींतून भाग्यबीजे पेरली जातील. विशिष्ट थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना छप्पर फाडके काही लाभ होतील. पुत्रपौत्रांच्या चिंता कायमच्या संपतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात ता. ८ व ता. ९ ऑक्टोबर हे दिवस विवाहविषयक गाठीभेटींतून फलदायी होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट नुकसानीच्या भयातून अस्वस्थ ठेवेल. काहींचे प्रवासात बेरंग. कामगारांशी वाद होतील.