weekly horoscope 7th april 2024 to 13th april 2024
weekly horoscope 7th april 2024 to 13th april 2024Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (७ एप्रिल २०२४ ते १३ एप्रिल २०२४)

मन आणि चंद्र यांचा संबंध ज्योतिषशास्त्रात जोडला गेलाय. चंद्र हा पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करत असतो.

चिंता व गुप्त शत्रूपीडा शक्य

मेष : सप्ताहारंभ न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आणि शनी-मंगळ सहयोगाच्या पार्श्वभूमीवर विचित्र चिंतातून हैराण करू शकतो. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्त शत्रूपीडा सतावेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची ता. ८ व ९ हे दिवस वस्तूंच्या हरवाहरवीतून जपण्याचे. बाकी ता. ११ व १२ हे दिवस तरुण-तरुणींना झकासच. वैयक्तिक छंद वा उपक्रमातून प्रसिद्धीचे.

जोडीदाराशी वाद टाळा

वृषभ : सप्ताह नैसर्गिक पाठबळ देणार नाही. यंत्रं, वाहनं आणि उपकरणं ऐनवेळी बिघडतील. सप्ताहारंभ एकूणच उपद्रव देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनातील वाद टाळावेत. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अर्थातच शुक्रवार, शनिवार उत्सव समारंभातून बेरंग करू शकतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची आजची रविवारची संध्याकाळ प्रिय व्यक्तींच्या भावरम्य गाठीभेठीची.

नोकरीत कर्तृत्वाला वाव मिळेल

मिथुन : यंदाचा गुढीपाडवा अतिशय संस्मरणीय राहील. तरुणांच्या जीवनातील मूलभूत प्रश्न सुटतील. नोकरीत कर्तृत्वाला वाव मिळेल. सप्ताहातील बुध आणि शुक्र या ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि त्यांचं इतर ग्रहांशी असलेले योग चांगलेच क्लिक होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीचा फायदा होईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवती अमावस्येचं सूर्यग्रहण मातृचिंता दर्शवते.

‘छप्पर फाडके’ लाभ होतील

कर्क : न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शनि -मंगळ सहयोग होत आहे. एखादी हितशत्रूंची पीडा सतावेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी नियमभंग अंगाशी येऊ शकते. काहींना विशिष्ट लोकापवादातून त्रास होऊ शकतो. बाकी पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राच्या विशिष्ट ग्रहयोगातून छप्पर फाडके लाभ होतील. गुरुवार, शुक्रवार मानसन्मानाचा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सूर्योदयी सुवार्तांचा.

परदेशगमनाच्या संधी येतील

सिंह : सप्ताहातील उद्याची सूर्यग्रहणाची अमावस्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर गांभीर्य वाढवू शकते. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहनं सांभाळावीत. पर्यटनस्थळी अरेरावी नको. बाकी सप्ताहातील शुभग्रहांची साथसंगती ता. ११ ते १३ या दिवसांत उत्तमच राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेचा विषय बनतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेश गमनाच्या संधी मिळतील.

उष्णताजन्य आजारांचा जोर राहील

कन्या : उद्याच्या न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचा आपल्या राशीवर अप्रत्यक्ष रोख राहीलच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सूर्यग्रहणाची जाणवतील अशी फळं मिळू शकतात. उष्णताजन्य विकार जोर धरतील. वैवाहिक जीवनातील आचारसंहिता पाळा. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १३ या दिवसांत शुक्रभ्रमणाच्या झुळुकीतून प्रसन्नता लाभेल. उत्तम खरेदी. विवाहविषयक मस्त गाठीभेटी, व्यावसायिक वसुली होईल.

मध्यस्थी जपून करावी

तूळ : उद्याचं न दिसणारं सूर्यग्रहण अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूचं पर्यावरण बिघडवू शकतं. कोणतीही शाब्दिक बाचाबाची नकोच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मौनात राहावं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणतेही मध्यस्थीचे व्यवहार जपून करावेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील लहान मुलांचा त्रास असह्य होऊ शकतो. बाकी सप्ताहातील शुभग्रहांची लॉबी गुढीपाडवा उत्तम साजरा करेल.

संसारातील संकटं जातील

वृश्चिक : सप्ताहातील शनी-मंगळाच्या युतीयोगाचा उष्माघात सहन करावा लागणार आहे. सतत तापट माणसांची गाठ पडू शकते. सांभाळून घ्या. बाकी यंदाचा गुढीपाडवा शुभच राहील. आजचा रविवार याची लक्षणं दाखवेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल. पती वा पत्नीवरील संकट निघून जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे दिवस गीत गाता चल करतील. ज्येष्ठा व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल.

नोकरीत बढतीची शक्यता

धनू : सप्ताहातील ग्रहमान कडक आचारसंहिता पाळावयास लावेल. सार्वजनिक जीवन सांभाळा. काहींना उद्याच्या सूर्यग्रहणाजवळ भावा-बहिणीच्या प्रश्नांतून त्रास होऊ शकतो. बाकी यंदाचा गुढीपाडवा शुभग्रहांच्या उत्तम साथसंगतीचाच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा वास्तुप्रवेश. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल. आजची रविवार संध्याकाळ घरात कार्ये ठरवणारी. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा सत्कार समारंभ होईल.

सरकारी योजनांचा लाभ होईल

मकर : शनी-मंगळ युती योगाचं प्रभावक्षेत्र शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर झळा पोहोचवू शकतं. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याची सूर्यग्रहणाची अमावस्या सांभाळावी. वैवाहिक जीवनात गैरसमज नकोत. बाकी यंदाचा गुढीपाडवा कलाकारांना छानच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती चांगल्याच प्रकाशात येतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे दिवस एकूणच मोठी भाग्यबीजं पेरणारे ठरतील, सरकारी योजनांचा व नियमांचा लाभ होईल.

खरेदीत फसवणुकीपासून जपा

कुंभ : उद्याच्या ग्रहणयुक्त अमावस्येचं क्षेत्र चोरी नुकसानीच्या घटनातून त्रस्त करू शकते. पाकीट सांभाळा. बाकी यंदाचा गुढीपाडवा घरातील प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता देईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींचा वास्तुप्रवेश होईल. ता.११ व १२ हे दिवस मोठे रंजक असतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार घरातील तरुणांच्या चिंता घालवेल.

वादग्रस्त येणं वसूल होईल

मीन : उद्याचं सोमवती अमावस्येचं सूर्यग्रहण आजूबाजूचं पर्यावरण बिघडवू शकतं. कोणताही नवा वाद उद्‍भवू देऊ नका. बाकी यंदाचा गुढीपाडवा वैयक्तिक भाग्यलक्षणंच दाखवेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्रास ता. ११ ते १३ हे दिवस मोठे प्रवाही राहतील. नोकरीविषयक मुलाखतींतून यश. विशिष्ट वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. कलाकारांचं यशस्वी मार्गक्रमण होऊ लागेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींची कायदेशीर पेचप्रसंगातून सुटका होईल. सरकारी साहाय्य मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com